मुंबई: मागील काही दिवसांपासून राज ठाकरे आणि मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यात सतत भेटी होत असल्याचे पाहायला मिळत आहे. मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी नुकतीच मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची भेट घेतली. या वर्षात राज ठाकरे यांनी सहाव्यांदा मुख्यमंत्र्यांच्या वर्षा या निवासस्थानी एकनाथ शिंदे यांची भेट झाली. राज यांनी मराठी पाट्या, टोलचा मुद्दा, धारावी पुर्नविकास, राम मंदिर, मुंबईतील विविध विकासकामं आणि कल्याण डोंबिवलीच्या विषयांवर मुख्यमंत्र्यांशी चर्चा केली. दरम्यान, राज ठाकरे हे या महिन्याच्या सुरुवातीला म्हणजेच 2 डिसेंबरलाही ‘वर्षा’वर गेले होते
विकास कामांसाठी आजची बैठक असल्याचं बोललं जात असलं तरीही, या बैठकीत राजकीय चर्चा देखील झाल्याचे बोलले जात आहे. 27 मार्च मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी मनसे अध्यक्ष राज ठाकरेंची त्यांच्या शिवाजी पार्क येथील निवासस्थानी जाऊन भेट घेतली. 20 एप्रिल 2023 रोजी राज ठाकरे यांच्या नेतृत्वाखाली नाशिक जिल्ह्यातील शेतकऱ्यांच्या शिष्टमंडळासह विविध शिष्टमंडळांनी सह्याद्री अतिथीगृह येथे मुख्यमंत्री शिंदे यांची भेट घेतली. 7 जुलै 2023 रोजी एकनाथ शिंदे यांनी मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांची त्यांच्या शिवतीर्थ या निवासस्थानी जाऊन भेट घेतली. 2 डिसेंबर 2023 रोजी राज ठाकरे यांनी वर्षा निवासस्थानी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची भेट घेतली. 28 डिसेंबर 2023 रोजी राज ठाकरे यांनी वर्षा निवासस्थानी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची भेट घेतली.
यापूर्वी मुख्यमंत्री शिंदे आणि राज ठाकरे यांची 2 डिसेंबरला वर्षा बंगल्यावर भेट झाली होती. यावेळी राज ठाकरे देखील दोन्ही नेत्यांमध्ये विविध मुद्द्यांवर चर्चा केली आहे. यावेळी मुंबईच्या एन्ट्री पॉईंट्ससंदर्भात चर्चा झाली होती.