Friday, July 3, 2026
  • Login
Pune Prime News
Download Android App
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
Pune Prime News
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
  • English

आईच्या डोळ्यांसमोरच डंपरने चिमुकल्याला चिरडले; कात्रज बायपासवर हृदय पिळवटणारा अपघात; जमावाने डंपर पेटवला

Laxman Dhengeby Laxman Dhenge
Thursday, 28 December 2023, 14:27

पुणे : हृदय पिळवटून टाकणारा अपघात पु्ण्यातील मंतरवाडी-कात्रज बायपास रस्त्यावर घडला आहे. एका डंपरने अॅक्टिव्हाला मागून जोरदार धडक दिली, यामध्ये चिमुरड्याचा जागीच मृत्यू झाला, तर आई गंभीर जखमी झाली आहे. आईच्या डोळ्यांसमोरच डंपरने चिमुकल्याला चिरडले अन् आईने फोडलेला टाहो आसमंत व्यापून गेला… बुधवारी सायंकाळच्या सुमारास हडपसरमध्ये ही घटना घडली. जखमी आईला उपचारासाठी जवळील रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. ही घटना पाहणारा प्रत्येकजण हळहळ व्यक्त करत होता. अपघात झाल्यानंतर डंपर चालकाने पळ काढल्यामुळे संतप्त जमावाने डंपर पेटवून दिला. पोलिसांनी या घटनेची माहिती मिळताच घटनास्थळावर धाव घेतली. चालकाविरोधात गुन्हा दाखल केला आहे.

पु्ण्यातील मंतरवाडी-कात्रज बायपास रस्त्यावर भरधाव वेगाने येणाऱ्या डंपरने अॅक्टीव्हा स्कुटरला धडक दिली. या स्कुटरवर शौर्य सागर आव्हाळे (वय वर्षे ८) हा आईसोबत जात होता. पण डंपरच्या धडकेने तो रस्त्यावर पडला. आईसमोरच डंपरने मुलाला चिरडले आणि शौर्यचा जागीच मृ्त्यू झाला. आईच्या डोळ्यांसमोर चिमुकल्याच्या अंगावरून डंपर गेला. त्यामुळे शौर्यच्या आईने टाहो फोडला. अपघातानंतर शौर्य आव्हाळे याचा मृतदेह पोस्टमार्टेमसाठी ससून रुग्णालयात पाठवण्यात आला.

डंपर चालकाने गाडी बाजूला लावली आणि गाडी सोडून पळून गेला. अपघातानंतर उपस्थितीत जमावाने आणि मृत मुलाच्या नातेवाईकांनी डंपरला आग लावली. याबाबत माहिती प्राप्त झाल्यानंतर घटनास्थळी पोलीस पथक दाखल झाले. त्याशिवाय अग्निशामन दलही पोहचले. पोलिसांनी लोकांना पांगवल्यानंतर अग्निशामन दलाने आग विझवली. घटनास्थळावर पळ काढणाऱ्या डंपर चालकाला पोलिसांनी तत्काळ ताब्यात घेतले. डंपर पेटवल्यामुळे परिसरात धुराचे लोळ उसळले. डंपरने पेट घेतल्यानंतर आगीच्या ज्वाळा आणि धूर लाईटच्या तारांना लागत असल्याने तत्काळ वीजपुरवठा खंडीत करण्यात आला. त्यामुळे मोठी दुर्घटना टळली.

 
Laxman Dhenge

Laxman Dhenge

ताज्या बातम्या

Rain Alert Maharashtra: पुढील 72 तास धोक्याचे! मुंबई, पुण्यासह राज्यातील अनेक जिल्ह्यांना मुसळधार पावसाचा इशारा

Friday, 3 July 2026, 7:47

Horoscope Today: आज ग्रहांची साथ कोणाला? 12 राशींसाठी जाणून घ्या दिवसाचे संपूर्ण भविष्य

Friday, 3 July 2026, 7:38

The Founding of YouTube A Short History

Friday, 3 July 2026, 0:55

The Founding of YouTube A Short History

Friday, 3 July 2026, 0:55

पुण्यातल्या कॉलेज तरुणींचा फ्री स्टाईल राडा! एकमेकींचे केस ओढले अन्… पहा व्हायरल Video

Thursday, 2 July 2026, 23:00

शनिवारवाड्याचा ‘हजारी कारंजा’ पुन्हा होणार सुरू! पेशवेकालीन जलव्यवस्थापन पूर्ववत करण्याचा केंद्राचा निर्णय

Thursday, 2 July 2026, 22:38
Next Post

'या' मुद्यांवरून राज ठाकरे आणि मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंच्या भेटींमध्ये वाढ; राजकीय वर्तूळात चर्चा

  • About us
  • Privacy Policy
  • Grievance Redressal
  • Fact-Checking Policy
  • Ownership & Funding Info

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
Don`t copy text!
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.