मुंबई : राज्यात राज ठाकरे यांची महाराष्ट्र नवनिर्माण सेना निवडणुकीच्या कामाला लागली असून ताकदीने मैदानात उतरणार असल्याचं समोर आलं आहे. या निवडणुकीत मनसे किती जागा लढवणार यासंदर्भात मनसेची सोमवारी लोकसभा मतदारसंघ आढावा बैठक पार पडली. या बैठकीत लोकसभेच्या २२ जागांचा आढावा घेण्यात आला आहे. मनसे मुंबईत सर्व जागांवर निवडणूक लढवण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे.
तर काही जागांवरील संभाव्य उमेदावारांच्या नावावर देखील शिक्कामोर्तब झाल्याचं समोर आलं आहे. मनसे मुंबईतील सर्व सहा जागांवर उमेदवार देण्याच्या तयारीत असून ठाणे, कोकण येथे प्रत्येकी तीन जागांवर उमेदवार देऊ शकते. कल्याणमधून श्रीकांत शिंदे यांच्या विरोधात देखील उमेदवार देण्याच्या तयारीत मनसे आहे.
राज ठाकरे यांनी बैठकी नेत्यांची, पदाधिकाऱ्यांची कानउघडणी करत जोमाने तयारीला लागण्याचे आदेश दिले आहेत. लोकसभा निवडणुकीचे उमेदवार कोण असतील याबाबतची चर्चा पुढच्या बैठकीत होणार आहे. मात्र दक्षिण मुंबईतून बाळा नांदगावकर यांचं नाव चर्चेत आहे. मुंबईच्या सर्व जागी मनसेकडून उमेदवार दिले जाऊ शकतात. कल्याणमधून विद्यमान आमदार राजू पाटील यांच नाव चर्चेत आहे. तर बारामती किंवा पुण्यातून वसंत मोरे तसेच सोलापूर मधून दिलीप धोत्रे यांच्या नावाची जोरदार चर्चा आहे.
मनसे ‘या’ 22 जागा लढवण्याच्या तयारीत?
मुंबई – ६
ठाणे- ३
कोकण -३
पुणे – ४
नाशिक – २
कोल्हापूर
सोलापूर
अमरावती
चंद्रपूर