Friday, September 25, 2026
  • Login
Pune Prime News
Download Android App
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
Pune Prime News
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
  • English

हवेली मोजणी कार्यालयाचा आणखी एक प्रताप! पुर्व दिशेला असलेली शेतजमीन चक्क पश्चिम दिशेला दाखवली; ‘सेटलमेंट’ कारभारामुळे शेतकरी महिला अडचणीत

Yogesh Kangudeby Yogesh Kangude
Tuesday, 8 July 2025, 19:11
Pune haveli mojani office issued wrong c copy map woman farmer in trouble pune

संदीप बोडके
पुणे: बलाढ्य कंपनीच्या दबावाला बळी पडून हवेली भूमि अभिलेख कार्यालयाने शेतकरी महिलेची पुर्व दिशेला असलेली शेतजमीन चक्क पश्चिम दिशेला दाखविल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे. मोजणी कार्यालयाच्या या ‘सेटलमेंट’ कारभारामुळे संबंधित महिला अडचणीत आली असून त्या मानसिक दबावाखाली आहेत.

मौजे थेऊर (ता. हवेली) येथील गट नबंर 122 मध्ये (थेऊर-नायगाव शिव रस्ता) हा प्रकार घडला आहे. योहान पुनावाला, दी पुना स्टड फार्म लि., सायझा ॲग्रो ॲड स्टड फार्म्स एल. एल. पी. आणि जयश्री पवार यांची या गटात जमीन आहे. या गटाबाबत अतिअतितातडी हद्दकायम 12498/2024 व अतिअतितातडी हद्दकायम वहिवाटीची 13360/2024 अशा दोन मोजण्या झालेल्या आहेत. या मोजणीच्या प्रकरणात गटातील सहधारकाची अर्जावर कोठेही सही नसताना, तसेच लगतधारकांना खोट्या पत्त्यावर नोटीस पाठवून हा प्रकार परस्पर केल्याचे समोर आले आहे.

हद्दकायम मोजणीच्या हद्दी खुणा दाखवल्याची तारीख 12 सप्टेंबर 2024 व वहिवाटीच्या मोजणीच्या हद्दी खुणा दाखवल्याची तारीख 16 डिसेंबर 2024 आहे. म्हणजेच तीन महिन्याच्या कालावधीत दोन्ही मोजणीच्या हद्दी खुणा अंतिम केलेल्या आहेत. गटातील सहधारक जयश्री पवार यांची 42 गुंठे जमीन गटाच्या पुर्व दिशेला म्हणजेच थेऊर-नायगाव शिव रस्ता लगत असून त्यांची वहीवाट देखील तशीच आहे. असे असतानाही त्यांची जमीन गटाच्या पश्चिम दिशेला दाखवण्याचा अजब उद्योग मोजणी कार्यालयाने केला आहे. त्यामुळे हवेली मोजणी कार्यालयातील क प्रत नकाशाचा आणखी एक गैरप्रकार समोर आला आहे.

“मोजणी कार्यालयाच्या दफ्तरांमधून अनेक गैरप्रकार समोर”
हवेली मोजणी कार्यालयाच्या दफ्तरांमधून अनेक नवीन कारनाम्यांचे किस्से बाहेर येत आहेत. हवेलीचे तत्कालीन उपअधिक्षक व भूकरमापक यांच्यावर खातरजमा न करता चुकीच्या मोजणीची क प्रत दिल्याने येरवडा पोलिस ठाण्यात नुकताच गुन्हा दाखल झाला आहे. या प्रकरणाचा धुरळा खाली बसण्याच्या आतच एका शेतकरी महिलेची जमीन त्याच गटात दुसऱ्या दिशेला दाखविल्याचा धक्कादायक प्रकार हवेलीच्या मोजणी कार्यालयाने केल्याचे उघड झाले आहे. या प्रकरणात सहधारक शेतकऱ्याला कोणतीही नोटीस बजावली गेली नाही. तसेच लगतधारक शेतकऱ्यांना चुकीच्या पत्त्यावर नोटीस पाठवली गेल्याचे उघड झाले आहे.

 

काय कारवाई होणार?
सर्वसामान्य नागरिकांना न्याय मिळविण्यासाठी हवेली भूमि अभिलेख कार्यालयाचे उंबरठे झिजवावे लागतात. तरीही त्यांना विलंबाच्या यादीत ठेवले जाते. मात्र, हवेली भूमि अभिलेख कार्यालयाने थेऊर (ता. हवेली) येथील गट क्र. 122 च्या दोन्ही क प्रती वेगवेगळ्या दिल्या आहेत. तसेच शेतकरी महिलेची फसवणूक करून दुसऱ्या दिशेला जागा दाखवली आहे. या चुकीच्या कामामध्ये सहभागी असणाऱ्या अधिकारी व कर्मचाऱ्यांवर भूमि अभिलेखचे उपसंचालक व जिल्हा अधीक्षक काय कारवाई करणार? याकडे संपूर्ण जिल्ह्याचे लक्ष लागले आहे.

संबंधित विषयात तक्रार अर्जाच्या अनुषंगाने सखोल तपासणी करण्यात येईल. उपलब्ध पुरावे व कागदपत्रे पाहून आवश्यकता असेल तर संबधितांना सुनावणीची नोटीस बजावण्यात येईल. न्याय प्रणालीच्या गुणवत्तेनुसार प्रस्तुतच्या प्रकरणात योग्य ते आदेश पारीत केले जातील.

– विकास गोफणे, उपअधीक्षक भूमि अभिलेख हवेली

Yogesh Kangude

Yogesh Kangude

ताज्या बातम्या

गणपती बाप्पा मोरया, पुढच्या वर्षी लवकर या….! मुंबई-पुण्यात विसर्जनाचा जल्लोष; बाप्पाला निरोप देण्यासाठी भाविकांची तुफान गर्दी

Friday, 25 September 2026, 8:21

पुणेकरांनो लक्ष द्या! गणेश विसर्जनासाठी मेट्रो 41 तास नॉनस्टॉप; 6 प्रमुख स्थानकांवर एन्ट्री-एक्झिटचे नियम बदलले

Friday, 25 September 2026, 7:58

ढोल-ताशा पथकांना नियमांचा ‘ब्रेक’!पुण्यात 120 ठिकाणी ध्वनिपातळीवर पोलिसांची नजर,आवाजाला लगाम…

Friday, 25 September 2026, 7:43

मान्सूनच पुन्हा जोरदार कमबॅक! मुसळधार पावसाचा हायअलर्ट; गरज असेल तरच घराबाहेर पडा

Friday, 25 September 2026, 7:27

अनंत चतुर्दशीला बाप्पाची खास कृपा! ‘या’ राशींचे नशीब चमकणार; पैसा, नोकरी आणि प्रेमात मोठ्या घडामोडी

Friday, 25 September 2026, 7:12

पुणेकरांसाठी अत्यंत महत्त्वाची बातमी! विसर्जन मिरवणुकीमुळे स्वारगेट आणि डेक्कनवरून सुटणाऱ्या पीएमपी बसचे थांबे बदलले

Thursday, 24 September 2026, 22:59
Next Post

लोणी काळभोर येथील गुटख्याच्या कारवाईत दीड लाखांची मांडवली ? नागरिकांमध्ये जोरदार चर्चा, पोलिस प्रशासन संशयाच्या भोवऱ्यात

  • About us
  • Privacy Policy
  • Grievance Redressal
  • Fact-Checking Policy
  • Ownership & Funding Info

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
Don`t copy text!
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.

news-on-whatsapp