Wednesday, November 25, 2026
  • Login
Pune Prime News
Download Android App
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
Pune Prime News
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
  • English

पुणे हादरलं! भरदिवसा शिवाजीनगर कोर्टाबाहेर रक्तरंजित थरार; जामिनावर सुटलेल्या तरुणाचे हात तोडले, कोयत्याने २० वार, पहा Video….

ASHLESHA MASKEby ASHLESHA MASKE
Wednesday, 25 November 2026, 14:42

पुणे : शिवाजीनगर न्यायालयाच्या प्रवेशद्वाराजवळ भरदिवसा एका तरुणावर गोळीबार करून आणि कोयत्याने वार करत त्याची हत्या करण्यात आल्याची धक्कादायक घटना घडली. पाच ते सात जणांनी केलेल्या या हल्ल्यात मंदार मारुती किवळे याचा मृत्यू झाला. या घटनेमुळे शहरात खळबळ उडाली आहे. विशेष म्हणजे, मंदारची चार दिवसांपूर्वीच जामिनावर सुटका झाली होती. त्यामुळे त्याच्या हत्येमागे जुन्या वैमनस्याचा संबंध आहे का, या दिशेने पोलिसांनी तपास सुरू केला आहे.

कात्रज येथील संतोषनगर परिसरात जागेच्या वादातून शुभम सुभाष चव्हाण या तरुणाचा खून करण्यात आला होता. या प्रकरणात आंबेगाव पोलिसांनी सराईत गुन्हेगार अमर दिलीप साकोरे (वय ४०), मंदार मारुती किवळे (वय ३५), गिरीश सुभाष बाबरे (वय २५) आणि योगेश बाबुराव ढोरे (वय ३५) या चौघांना अटक केली होती.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, शुभम चव्हाण आणि मुख्य आरोपी अमर साकोरे यांच्यात एका जागेवरून वाद सुरू होता. घटनेच्या दिवशी पहाटे शुभम कात्रजमधील संतोषनगर परिसरातून जात असताना अमर साकोरे, मंदार किवळे आणि त्यांच्या इतर साथीदारांनी त्याला अडवले. त्यानंतर शिवीगाळ आणि मारहाण सुरू केली. आरोपींच्या तावडीतून सुटण्यासाठी शुभमने पळ काढला असता, आरोपींनी त्याचा पाठलाग केला. त्याला बांबूने मारहाण करण्यात आली आणि त्यानंतर डोक्यात दगड घालून त्याचा खून करण्यात आल्याचे पोलिसांनी सांगितले होते.

पहा धक्कादायक व्हिडीओ 👇https://www.instagram.com/reel/DgKGq_GRmMb/?utm_source=ig_web_copy_link&hvrq=NTc4MTIwNjQ2YQ==

या प्रकरणाचा तपास करताना आंबेगाव पोलीस ठाण्याचे निरीक्षक शरद झिने यांच्या पथकाने गुप्त माहितीच्या आधारे कामठी बुद्रुक येथे छापा टाकला होता. या कारवाईत मंदार किवळेसह चौघांना अटक करण्यात आली होती. पुढे याच प्रकरणात मंदारला जामीन मिळाला होता.

कात्रजमधील हत्या प्रकरणात जामिनावर बाहेर आलेल्या मंदारची आता शिवाजीनगर न्यायालयाबाहेर हत्या करण्यात आली आहे. त्यामुळे जुन्या हत्येच्या प्रकरणातून बदला घेण्याच्या भावनेतून हा हल्ला झाला का, याचा तपास पोलीस करत आहेत.

दरम्यान, पुणे पोलिसांनी या हल्ल्यातील दोन संशयितांची ओळख पटवली असून, आरोपींचा शोध घेण्यासाठी विविध पथके रवाना केली आहेत. हत्येमागील नेमके कारण आणि हल्ल्यात सहभागी असलेल्या इतर व्यक्तींचा शोध घेण्याचे काम सुरू आहे.

 

ASHLESHA MASKE

ASHLESHA MASKE

ताज्या बातम्या

पुणे हादरलं! भरदिवसा शिवाजीनगर कोर्टाबाहेर रक्तरंजित थरार; जामिनावर सुटलेल्या तरुणाचे हात तोडले, कोयत्याने २० वार, पहा Video….

Wednesday, 25 November 2026, 14:42

पुण्यात बँक अधिकाऱ्यांनीच केली फसवणूक! वसुली अधिकाऱ्यांशी संगनमत करून ज्येष्ठ व्यक्तीचे १७ लाख रुपये लाटले

Wednesday, 25 November 2026, 14:31

निर्माण डेव्हलपर्स, मंगलमूर्ती वास्तूसह आठ जाहिरातदारांविरोधात गुन्हा दाखल! पुण्यात अनधिकृत जाहिरात फलक लावणे चांगलेच भोवले

Wednesday, 25 November 2026, 14:28

महाराष्ट्रातून गुजरातला गेलेल्या पाटील कुटुंबासोबत घडलं भयंकर! संपूर्ण कुटुंबाला कालव्यात फेकलं; 3 जणांचा मृत्यू, 2 मुलं बेपत्ता

Wednesday, 25 November 2026, 14:02

पुणेकरांनो सावधान! दुकानासमोर घाण दिसली तर भरावा लागणार 10 हजारांचा दंड; पाचव्या वेळी परवाना होणार रद्द

Wednesday, 25 November 2026, 13:51

Breaking News: पुणे कोर्टात भरदिवसा झालेल्या हल्ल्याने खळबळ! आरोपीवर हल्ला करून पिस्तूल घटनास्थळी सोडून हल्लेखोर फरार

Wednesday, 25 November 2026, 13:27
  • About us
  • Privacy Policy
  • Grievance Redressal
  • Fact-Checking Policy
  • Ownership & Funding Info

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
Don`t copy text!
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.

news-on-whatsapp