Pankaj Tripathi :मुंबई : बॉलिवूडमधील प्रसिद्ध अभिनेते पंकज त्रिपाठी यांनी भारतीय निवडणूक आयोगाचे राष्ट्रीय आयकॉन पद सोडले आहे. याची माहिती निवडणूक आयोगानं ट्विटरवर दिली आहे. त्यांनी स्वतः राष्ट्रीय आयकॉन या पदावरून माघार घेतली आहे.
निवडणूक आयोगाचे ट्वीट
निवडणूक आयोगाने ट्वीटमध्ये लिहिलं की, एका आगामी चित्रपटात राजकीय नेत्यांची भूमिका साकारणारे अभिनेते पंकज त्रिपाठी यांनी एमओयूच्या अटींनुसार इसीआयच्या नॅशनल आयकॉन पद सोडलं आहे. ऑक्टोबर 2022 पासून मतदार जागरूकता आणि SVEEP मध्ये त्यांनी दिलेल्या प्रभावी योगदानाबद्दल इसीआय कृतज्ञता व्यक्त करते. “पंकज त्रिपाठी हे ‘मैं अटल हूं’ या बायोपिकमध्ये अटल बिहारी वाजपेयी यांची भूमिका साकारत आहे.
ऑक्टोबर 2022 मध्ये, निवडणूक आयोगाने पंकज त्रिपाठी यांची राष्ट्रीय आयकॉन या पदावर नियुक्ती केली होती. आता पंकज त्रिपाठी यांनी हे पद सोडलं आहे. निवडणूक आयोगाने त्यांच्या ट्विटर अकाऊंटवर ट्वीट शेअर करुन याबाबत माहिती दिली आहे. या ट्वीटमध्ये त्यांनी पंकज त्रिपाठी यांच्या आगामी चित्रपटातील भूमिकेचा देखील उल्लेख केला आहे.
सध्या पंकज त्रिपाठी त्याच्या ‘मैं अटल हूं’ या त्यांच्या चित्रपटाचे प्रमोशन करत आहेत. 19 जानेवारी 2024 रोजी प्रेक्षकांच्या भेटीला येईल. ऑक्टोबर 2022 मध्ये, निवडणूक आयोगाने त्यांची राष्ट्रीय आयकॉन म्हणून नियुक्ती केली. नुकतेच त्यांनी आपल्या राजकारण या विषयाच्या आवडीबद्दल सांगितले होते, त्यामुळे आता त्यांनी स्वतः राष्ट्रीय आयकॉन या पदावरून माघार घेतली आहे.