मुंबई : राष्ट्रवादी काँग्रेसचे ज्येष्ठ नेते नवाब मलिक यांचे जावई समीर खानं यांचे निधन झाले आहे. आज (दि.3) त्यांनी अखेरचा श्वास घेतला. समीर खान यांचा काही दिवसांपूर्वी अपघात झाला होता. या अपघातात ते भीषण जखमी झाले होते.
नवाब मलिक यांनी स्वत: ट्विट करत याबाबत माहिती दिली आहे. “माझे जावई समीर खान यांचे निधन झाले आहे. अल्लाह त्यांना जन्नतमध्ये सर्वोच्च स्थान देवो. या नुकसानीबद्दल आम्ही शोक व्यक्त करतोय”, असं नवाब मलिक ट्विटमध्ये म्हणाले आहेत. तसेच या दुखद घटनेनंतर आपले पुढील दोन दिवसांचे सर्व नियोजित कार्यक्रम पुढे ढकलण्यात आले असल्याची माहिती नवाब मलिक यांनी दिली आहे.
दरम्यान, समीर खान हे नवाब मलिक यांची मोठी मुलगी निलोफर मलिक हिचे पती होते. समीर खान यांचा 17 सप्टेंबर रोजी सकाळी 11 वाजताच्या सुमारास अपघात झाला होता. निवडणुकीच्या तोंडावर मलिक कुटुंबावर दु:खाचा डोंगर कोसळला आहे. त्यामुळे अणुशक्तीनगर परिसरात हळहळ व्यक्त केली जात आहे.
Inna lillahi wa inna ilayhi raji’un.
My son-in-law, Sameer Khan, has passed away. May Allah grant him the highest place in Jannah. As we mourn this loss, all my scheduled for the next two days are postponed. Thank you for your understanding, Please keep him in your prayers.— Nawab Malik نواب ملک नवाब मलिक (@nawabmalikncp) November 3, 2024