पुणे प्राईम न्यूज: उपमुख्यमंत्री अजित पवार गटासोबत असणारे बेचाळीसावे आमदार कोण? असा प्रश्न राज्याच्या राजकीय वर्तुळात गेल्या काही दिवसांपासून जोरदार चर्चेत आहे. ते बेचाळीसावे आमदार म्हणजे राष्ट्रवादीचे मुंबई अध्यक्ष नवाब मलिक असल्याची माहिती सूत्रांकडून मिळत आहे. शुक्रवारी झालेल्या निवडणूक आयोगाच्या सुनावणी दरम्यान अजित पवार गटाकडून बेचाळीस आमदार असल्याचा असा दावा करण्यात आला आहे. तसेच नवाब मलिक यांना तुरुंगातून बाहेर काढण्यामागे उपमुख्यमंत्री अजित पवार असल्याची चर्चाही दबक्या आवाजात सुरू आहे.
राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा वाद हा सध्या निवडणूक आयोगासमोर गेला असून यावर सुनावणी सुरू आहे. शुक्रवार ६ ऑक्टोबरपासून सुरू असलेल्या या सुनावणी दरम्यान अजित पवार गटाकडून राष्ट्रवादीच्या एकूण 53 आमदारांपैकी 42 आमदार आमच्या पाठीशी असल्याचा दावा करण्यात आला होता.
सध्या सोशल मीडियावर राष्ट्रवादीच्या अजित पवार गटाच्या 41 आमदारांची यादी वेगाने व्हायरल होत आहे. परंतु, अजित पवार गटानं 42 आमदार आपल्या बाजूला असल्याचा दावा केला. त्यामुळे तो बेचाळीसावा आमदार कोण? अशी जोरदार चर्चा रंगली होती.
हेही वाचा:
टीम इंडियाने जिंकले सुवर्ण, आशियाई स्पर्धेत पुरुष क्रिकेट संघाची गोल्डन कामगिरी
मंत्री हसन मुश्रीफ आणि त्यांच्या मुलांनी शेतकऱ्यांची केली फसवणूक; पीएमएलए कोर्टाचं निरीक्षण
भाजप नेते आणि माजी आमदार विजयराज शिंदे यांच्या वाहनाचा भीषण अपघात, रुग्णालयात उपचार सुरू