नवी दिल्ली : देशात तरूणाईकडून तसचे वडिलधाऱ्यांकडून युपीआयाचा वापर झपाट्याने वाढला आहे. मात्र, आता त्यांना धक्का देणारी बातमी समोर आली आहे. येत्या काही दिवसांत युपीआय आधारीत पेमेंटसाठी शुल्क मोजावे लागू शकते.
घरी बसल्या आपण १००० किलोमीटर लांब असणाऱ्या गरजूंना युपीआच्या माध्यमातून पैसे पाठवू शकत आहोत. सहज सोप्या पद्धतीने पैशांचे हस्तांतरण करत आहोत. पण आता सर्वसामान्यांना या सेवेसाठी शुल्क मोजावे लागेल. भारतीय राष्ट्रीय देयके महामंडळाचे प्रमुख दिलीप असबे यांनी गुरुवारी याविषयीची माहिती दिली. त्यांच्या मते देशातील व्यापाऱ्यांना एका युपीआय आधारीत पेमेंटसाठी शुल्क मोजावे लागू शकते.
केवळ मोबाईल क्रमांकाच्या आधारे समोरील व्यक्तीच्या खात्यात काही सेकेंदात आपण पाहीजे तेवढी रक्कम टाकतं होतो. युपीआयवर ग्राहकांना सध्या कोणतेही शुल्क द्यावे लागत नाही. पण ही व्यवस्था पूर्णपणे मोफत राहणार नाही.
लोकांना युपीआयशी जोडण्यासाठी कॅशबॅक सारख्या आकर्षक योजना यासाठी अधिक पैशांची गरज भासणार आहे. त्यांच्या मते अजून 50 कोटी लोकांना या व्यवस्थेशी जोडायचे आहे. दीर्घकालीन सुविधेच्या दृष्टीने हे शुल्क आकारण्यात येणार आहे. हे शुल्क लहान व्यापाऱ्यांवर नाही तर मोठ्या व्यापाऱ्यांना आकारले जाईल. ही व्यवस्था कधी लागू होईल हे सांगता येत नाही. पण दोन-तीन वर्ष अथवा त्यापेक्षा अधिक काळ या व्यवस्थेसाठी लागू शकतो. त्यांनी किती शुल्क आकारले जाणार याची माहिती दिली नाही.