Wednesday, April 1, 2026
  • Login
Pune Prime News
Download Android App
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
Pune Prime News
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
  • English

Munde vs Jarange: जरांगे-मुंडे वादात करुणा शर्मांची एन्ट्री! “धनंजय मुंडेंचा धंदाच तो”; नार्को टेस्ट आणि मोबाईल तपासणीची मागणी

ASHLESHA MASKEby ASHLESHA MASKE
Friday, 7 November 2025, 18:01
Munde vs Jarange: Karuna Sharma's entry in the Jarange-Munde controversy! "It's Dhananjay Munde's business"; Demand for narco test and mobile check

Photo-Social Media

मुंबई: मराठा आंदोलक मनोज जरांगे पाटील यांच्या (Munde vs Jarange) हत्येचा कट रचण्यात (Manoj Jarange Patil) आल्याची माहिती समोर आल्यानंतर (Dhananjay Munde) महाराष्ट्रात (Karuna Sharma) खळबळ उडाली आहे. या प्रकरणी पोलिसांनी अमोल खुणे आणि दादासाहेब गरड या दोघांना अटक केली आहे. त्यानंतर मनोज जरांगे पाटील यांनी पत्रकार परिषद घेऊन माजी मंत्री धनंजय मुंडे यांच्यावर गंभीर आरोप केले. जरांगे यांनी म्हटले की, धनंजय मुंडे यांनी माझ्या विरोधात षड्यंत्र रचले असून मला मारण्यासाठी अडीच कोटी रुपयांची डील झाली. ही बैठक भाऊबीजेच्या दिवशी झाली होती, असे त्यांनी सांगितले. या आरोपांनंतर धनंजय मुंडे यांनी पत्रकार परिषद घेऊन जरांगे आणि स्वतःची ब्रेन टेस्ट करण्याची मागणी केली असून या प्रकरणाची चौकशी सीबीआयकडून व्हावी, अशी मागणी केली आहे.

 

या प्रकरणावर करुणा शर्मा यांनी देखील प्रतिक्रिया दिली आहे. त्या म्हणाल्या की, जरांगे भाऊंनी जे सांगितले की त्यांच्याविरुद्ध कट रचला गेला आहे, ते खरे आहे. धनंजय मुंडे यांचा धंदाच तो आहे. जे त्यांच्या विरोधात जातात, त्यांच्या विरोधात ते कटकारस्थान रचतात. जरांगे पाटील यांच्या लोकांना फोडण्यात आले आणि मला याची माहिती एक महिना आधीच होती. दादा गरड माझ्या घरी तीन वेळा आला होता. पोलीस अधिकाऱ्यांनी त्यांचा मोबाईल तपासावा, कारण त्यात धनंजय मुंडे आणि त्यांची रेकॉर्डिंग आहे, असे त्यांनी सांगितले.

करुणा शर्मा पुढे म्हणाल्या की, माझी देखील नार्को टेस्ट व्हायला पाहिजे. पाच लाख रुपये आणि गाडीची बाब या प्रकरणात आहे. दोन नोव्हेंबर रोजी तो माझ्याकडे आला आणि मला पैसे मागितले. मी न्याय मागण्यासाठी जरांगे यांच्याकडे गेले होते. कराड याने मला बेदम मारहाण केली होती, त्याचे CCTV फुटेज आहे. त्याने आपल्या पत्नीला मारले आहे, तो आणखी काय करू शकत नाही? मी मुंडे घराण्याची सून आहे. त्यांनी माझ्यासोबत जे केले त्यामुळे माझी आणि त्यांच्या दोघांचीही नार्को टेस्ट व्हायला हवी. माझ्याकडे पुरावे आहेत आणि वेळ आल्यावर ते दाखवेन. माझ्या मागे कोणी नाही, पण मला न्याय पाहिजे. दादा गरड याची रेकॉर्डिंग मी स्वतः ऐकली आहे. त्याने मला पाच वेळा फोन केला आणि घरी आला होता, असेही करुणा शर्मा म्हणाल्या.

मनोज जरांगे यांनी केलेल्या आरोपांबाबत ते म्हणाले होते की, बीडचा कांचन नावाचा माणूस आहे जो धनंजय मुंडे यांचा कार्यकर्ता किंवा पीए आहे. मुंडे यांनी माझ्या विरोधात षड्यंत्र रचले. बीडच्या कार्यकर्त्यांनी या आरोपींना परळीला नेले होते. तिथे मोठी बैठक झाली होती. त्या बैठकीत धनंजय मुंडे उपस्थित होते आणि त्यांनी या लोकांशी 20 मिनिटे चर्चा केली. मला मारण्यासाठी अडीच कोटी रुपयांची डील झाली होती. भाऊबीजेच्या दिवशी ही बैठक पार पडली होती. आरोपींनी म्हटले होते की, मला जुनी गाडी द्या, मी गाडीने गाडीला ठोकतो. घातपात करून कोणी मोठे राजकारणी होत नाही. धनंजय मुंडे यांची ही वृत्ती चुकीची आहे, असा आरोप मनोज जरांगे यांनी केला.

ASHLESHA MASKE

ASHLESHA MASKE

ताज्या बातम्या

पुण्यात महिला पत्रकाराशी गैरवर्तन; संतोष पंडितविरोधात गुन्हा दाखल

Wednesday, 1 April 2026, 9:59

15 वर्षांची प्रतीक्षा संपली! आजपासून देशात ‘महाजनगणने’चा श्रीगणेशा; तुमच्या दारात येऊन अधिकारी विचारणार ‘हे’ प्रश्न

Wednesday, 1 April 2026, 9:53

भक्तांना लुटलं, पुण्यात फ्लॅट घेतला! अशोक खरातने भोंदूगिरीकरून उभारली शेकडो कोटींची संपत्ती; बिल्डरला दिले ‘रोख’ पैसे

Wednesday, 1 April 2026, 9:37

शेतकरी मित्रांनो लक्ष द्या! अनुदानाच्या नियमात मोठा बदल; 1 एप्रिलपासून ‘या’ कामाशिवाय खात्यात येणार नाहीत पैसे

Wednesday, 1 April 2026, 9:13

शस्त्रपरवाना वादात अमिताभ गुप्ता आणि जालिंदर सुपेकर निर्दोष; दोन वर्षांच्या चौकशीनंतर मिळाला मोठा दिलासा

Wednesday, 1 April 2026, 9:06

पाकिस्तानची दिग्दर्शक आदित्य धर यांच्याकडे 500 कोटींची मागणी; वाचा काय आहे कारण?

Wednesday, 1 April 2026, 8:53
Next Post

Pune Accident: कोरेगाव मूळ येथे अज्ञात वाहनाच्या धडकेत एक जण जागीच ठार तर एकजण जखमी

  • About us
  • Privacy Policy
  • Grievance Redressal
  • Fact-Checking Policy
  • Ownership & Funding Info

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
Don`t copy text!
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.