Mumbai Crime: मुंबईच्या मालाड मालवणी परिसरातून धक्कादायक घटना समोर आली आहे. पतीने पत्नीवरील संशयातून हत्या केल्याची घटना घडली आहे. ही धक्कादायक घटना मालवणी कच्च्या रोड आडवा पट्टा नजदीक घडली आहे. (mumbai latest crime news)

समोर आलेल्या माहीतीनुसार, सिराज नाईक (वय 56 वर्ष) असे आरोपीचे नाव आहे. तो पत्नी मुमताज सोबत मालवणी परिसरात वास्तव्यास होता. त्याने पत्नीची हत्या केली आणि तो मालवणी पोलिसांकडे सरेंडर झाला. दोन महिन्यापासून पत्नी मुमताजच्या चरित्र्यावर सिराजला संशय होता. इतर पुरुषासोबत तिचे संबंध असल्याच्या संशयातून त्याने पत्नीला जीवे मारले. या रागातून त्याने काल (२० सेप्टेंबर) ला सकाळच्या सुमारास दगडाने ठेचून पत्नीची हत्या केली.

या प्रकरणी मालवणी पोलिसांनी हत्येचा गुन्हा दाखल करून आरोपी पती सिराज नाईक याला ताब्यात घेतले आहे. हत्या मागे अजून काही कारण आहे का या संदर्भात अटक आरोपीकडून मालवणी पोलीस अधिक तपास करत आहे.








