मुंबई: मुंबईत आज (दि. 19) भाजप युवा मोर्चाच्या कार्यकर्त्यांनी काँग्रेसच्या कार्यालयात शिरून तोडफोड करण्याचा प्रयत्न केला. यावेळी काँग्रेस पक्ष कार्यालयाबाहेर तुफान राडा झाला. त्यानंतर पोलिसांकडून भारतीय जनता पक्षाच्या युवा मोर्चाच्या कार्यकर्त्यांवर लाठीचार्ज करण्यात आला. आता भाजपने छुप्या पद्धतीने हा मोर्चा काढल्याचा आरोप काँग्रेस पक्षाकडून करण्यात येत आहे. या प्रकारावरून वातावरण चांगलेच तापले असून विरोधकांकडून भाजपला कोंडीत पकडण्याचा प्रयत्न सुरू आहे.
काँग्रेस कार्यालयावर झालेल्या हल्ल्याची माहिती मिळाल्यानंतर पोलीस तातडीने घटनास्थळी दाखल झाले. तसेच परिस्थिती नियंत्रणात आणण्यासाठी पोलिसांनी भारतीय जनता पक्षाच्या कार्यकर्त्यांवर लाठीचार्ज केला. भाजपच्या कार्यकर्त्यांना पोलिसांकडून बेदम चोप मिळाला. तर दुसरीकडे मात्र पोलीस वेळेवर न आल्याचा आरोप काँग्रेसच्या पदाधिकाऱ्यांकडून करण्यात आला.
काँग्रेस पक्षाच्या नेत्या आणि खासदार वर्षा गायकवाड यांच्या कार्यालयावर भाजप युवा मोर्चाच्या कार्यकर्त्यांनी हल्ला केला. या हल्ल्याचा व्हिडीओ देखील समोर आला आहे. व्हिडिओमध्ये भाजप युवा मोर्चाचे कार्यकर्ते कार्यालयात घुसत असल्याचे पाहायला मिळत आहे, कार्यालयाचे बंद असलेले दार उघडण्याचा प्रयत्न देखील त्यांनी केला. त्यानंतर आक्रमक कार्यकर्त्यांनी कार्यालयातील खुर्च्यांची तोडफोड करण्यात आली.
#WATCH | Maharashtra: BJP workers vandalise the Congress party office in Mumbai. They are protesting against the Congress party and are alleging that the Congress has insulted Baba Saheb Ambedkar.
Police use lathi-charge to disperse them. pic.twitter.com/7NFz0XdVCC
— ANI (@ANI) December 19, 2024