Lok Sabha elections 2024 : महाराष्ट्र नवनिर्माण सेना गेल्या काही दिवसापासून लोकसभा निवडणुकांची जोरदार तयारी करत आहे. देशात पुढच्या काही दिवसांमध्ये लोकसभा निवडणुकीचं बिगूल वाजण्याची शक्यता आहे.त्यामुळे मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी मनसे नेते आणि पदाधिकाऱ्यांबरोबर लोकसभा निवडणुकांच्या दृष्टीने बैठका घेऊन आढावा घेतला.
राज ठाकरे यांचं पुणे लोकसभा मतदारसंघाकडेदेखील विशेष लक्ष आहे. गेल्या काही महिन्यांमध्ये राज ठाकरे सातत्याने पुण्याचा दौरा देखील करत आहेत. याशिवाय पुणे लोकसभेच्या जागेसाठी पुण्यातील मनसेचे स्थानिक नेते देखील इच्छुक आहेत. राज ठाकरे यांनी पदाधिकाऱ्यांना स्वबळावर निवडणूका लढण्याची तयारी करण्याचे आदेश दिले आहेत.
मात्र, गेल्या काही दिवसात मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यासोबत राज ठाकरे यांच्या सतत भेटीगाठी झाल्या आहेत, त्यासोबत भाजपच्याही अनेक नेत्यांनी देखील राज ठाकरे यांच्या भेटी घेतलेल्या आहेत. त्यामुळे आता मनसेमध्ये धाकधूक वाढत असल्याचं चित्र समोर आलं आहे. अशातच आता मनसेच्या लोकसभा निवडणुकीसाठी संभाव्य उमेदवारांची यादी समोर आली आहे.
मनसेचे लोकसभा निवडणुकीसाठी संभाव्य उमेदवार
- चंद्रपूर – राजू उंबरकर
- नाशिक – डॉ. प्रदीप पवार
- कल्याण- राजू पाटील
- ठाणे- अभिजित पानसे
- उत्तर मुंबई- गजानन राणे
- ईशान्य मुंबई- संदीप देशपांडे
- उत्तर मध्य- मुंबई संजय तुर्डे
- दक्षिण मध्य मुंबई- नितीन सरदेसाई
- दक्षिण मुंबई- बाळा नांदगावकर
- रायगड- वैभव खेडेकर
- पुणे- वसंत मोरे/साईनाथ बाबर
- बारामती- सुधीर पाटस्कर
- सोलापूर- दिलीप धोत्रे