मुंबई: पुण्यातील निलेश घायवळ (Nilesh Ghaywal) प्रकरणात आता राष्ट्रवादी काँग्रेस (शरद पवार गट) चे आमदार रोहित पवार (Rohit Pawar) यांनी थेट भाजप आणि शिंदे गटातील नेत्यांची नावे घेत गंभीर (Rohit Pawar’s serious allegations against Santosh Bangar and Ram Shinde) आरोप केले आहेत. गुंड निलेश घायवळच्या भावाला गुन्हेगारी पार्श्वभूमी असूनही शस्त्र परवाना मिळाल्याच्या निर्णयामागे वरिष्ठ पातळीवरील हस्तक्षेप असल्याचा दावा त्यांनी केला आहे.

आमदार रोहित पवार (Rohit Pawar) म्हणाले…
रोहित पवार म्हणाले, “निलेश घायवळचा भाऊ गुन्हेगारी पार्श्वभूमी असलेला असूनही त्याला बंदुकीचा परवाना देण्यात आला. यामागे गृहविभागातील लोक, तसेच भाजपचे नेते राम शिंदे आणि शिवसेना शिंदे गटाचे मंत्री तानाजी सावंत यांचा संबंध असू शकतो.”

सावंत व बांगर यांच्यावरही आरोप
याच पार्श्वभूमीवर रोहित पवार म्हणाले, “संतोष बांगर (Santosh Bangar) यांचे फोटो अधिवेशनात निलेश घायवळसोबत दिसतात. सभागृहात राम शिंदे (Ram Shinde), बांगर आणि घायवळ हे एकत्र फिरताना दिसतात. हे संबंध केवळ राजकीय नाहीत, तर आर्थिक हितसंबंधांचेही संकेत मिळत आहेत.”
पुढे बोलताना म्हणाले, जेथे पवनचक्की आहेत तेथे शेतकऱ्यांना दमदाटी करून जमिनी घेतल्या जात आहेत. यामागे निलेश घायवळ व त्याच्या गँगचा हात आहे. या व्यवहारांशी तानाजी सावंत यांचे थेट नाही, पण त्यांच्या कुटुंबातील काही सदस्यांचे पाठबळ असल्याचा दावा त्यांनी केला.







