Tuesday, June 23, 2026
  • Login
Pune Prime News
Download Android App
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
Pune Prime News
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
  • English

लडकी का चक्कर बाबूभैय्या! गर्लफ्रेंडचा खर्च भागवण्यासाठी बॉयफ्रेंडचा कारनामा; कृत्याने पोलिसांनाही धक्का…

ASHLESHA MASKEby ASHLESHA MASKE
Thursday, 9 October 2025, 18:38
Nagpur Crime: Girl's affair Babubhaiyya! Boyfriend's act to meet girlfriend's expenses; The act shocked the police too...

Photo-Social Media

नागपूर: शिक्षण घेत असतानाच (Nagpur Crime)  हॉटेल मॅनेजमेंटचा एक विद्यार्थी (Nagpur News) दुचाकी चोरीच्या मार्गावर गेला आणि अवघ्या काही महिन्यांत तब्बल 11 दुचाकींची चोरी करून पोलिसांच्या रडारवर आला. जुगार खेळण्याचं व्यसन आणि गर्लफ्रेंडच्या खर्चासाठी चोरी करणाऱ्या या तरुणाला अखेर कळमना पोलिसांनी जेरबंद केलं आहे.

अटकेत असलेल्या तरुणाचं नाव देवेश देवेंद्र सनोडिया (वय 20, रा. सुंदरनगर, पारडी) असं आहे. मार्च 2025 पासून ऑक्टोबरपर्यंत कळमना परिसरातील कडकनाथ मार्केटमध्ये दुचाकी चोरीच्या घटना वाढल्या होत्या. व्यापारी, कामगार आणि ग्राहकांची वाहने बाजारातून वारंवार गायब होऊ लागल्याने नागरिक त्रस्त झाले होते.

या वाढत्या चोरीच्या घटनांवर अंकुश आणण्यासाठी पोलिसांनी त्या ठिकाणाचा सखोल अभ्यास करून नकाशा तयार केला. पोलिसांनी स्वतःच्या खर्चाने सीसीटीव्ही कॅमेरे बसवले आणि त्याच फुटेजमधून आरोपीपर्यंत पोहोचण्यात यश मिळाले. 5 ऑक्टोबर रोजी देवेशला अटक करण्यात आली. त्याच्याकडे एक चोरीची दुचाकी सापडली. चौकशीत त्याने आणखी 10 गाड्या चोरी केल्याची कबुली दिली.

 

पोलिसांनी आरोपीकडून एकूण 11 दुचाकी आणि एक आयफोन असा जवळपास 3 लाख 25 हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे. तपासात समोर आलं की, देवेशच्या वडिलांचे कळमना मार्केटमध्ये भाजीपाला विक्रीचे दुकान आहे. त्यामुळे तो नियमित त्या परिसरात वावरत असे. लोक खरेदीत गुंग असताना तो गाड्यांच्या चाव्यांचा वापर करून दुचाकी चोरत असे.

चोरी केलेल्या गाड्या तो खोट्या कागदपत्रांच्या आधारे OLXसारख्या ऑनलाइन प्लॅटफॉर्मवर विकत असे. त्यामुळे अनेक निष्पाप लोकांनी त्याच्याकडून या गाड्या विकत घेतल्याचे पोलिस तपासात स्पष्ट झाले आहे. देवेश हॉटेल मॅनेजमेंटचं शिक्षण घेत असला तरी त्याला जुगाराचे व्यसन होते. त्यातून झालेला तोटा आणि गर्लफ्रेंडच्या खर्चासाठी त्याने चोरीचा मार्ग अवलंबला.

पोलिसांच्या चौकशीत समोर आलं की तो दर गुरुवार आणि शनिवारी सकाळी, जेव्हा मार्केटमध्ये सर्वाधिक गर्दी असते, त्यावेळी होंडा पॅशन आणि होंडा स्प्लेंडर या लोकप्रिय मॉडेलच्या गाड्यांवर डोळा ठेवत असे. पोलिसांनी गेल्या पाच महिन्यांपासून त्याच्यावर गुप्त पाळत ठेवली होती. शेवटी त्याच्या हालचालींचा बारकाईने अभ्यास करून सापळा रचण्यात आला आणि त्याला जेरबंद करण्यात आले. या प्रकरणी पोलिस पुढील तपास करत असून देवेशकडून आणखी काही गुन्ह्यांचा तपशील समोर येण्याची शक्यता आहे.

ASHLESHA MASKE

ASHLESHA MASKE

ताज्या बातम्या

नागपूरची कमान आता नांगरे पाटलांच्या हाती! 14 आयपीएस अधिकाऱ्यांच्या बदल्या; गुन्हेगारीवर नियंत्रण मिळवण्याचा सरकारचा प्रयत्न

Tuesday, 23 June 2026, 20:51

सोने सांगवीत सिमेंट वाहतूक करणारा ट्रक भिंतीवर आदळला,सुदैवाने मोठी दुर्घटना टळली

Tuesday, 23 June 2026, 20:46

उरुळी कांचन येथे दुचाकी गाडीच्या डिक्कीतून भरदिवसा 81 हजार रुपये पळवले; उरुळी कांचन पोलिसांचा फिर्यादीला ‘लोणीकंद’ला जाण्याचा सल्ला..

Tuesday, 23 June 2026, 20:19

“याआधीही सियाने केतनला दरीत ढकललं होतं” केतनच्या वडिलांचा धक्कादायक खुलासा; म्हणाले “तो एका झाडामुळे वाचला होता…”

Tuesday, 23 June 2026, 19:53

खासदार बजरंग बाप्पाच्या लेकावर खुनाचा आरोप? “हॉटेल मालक हत्या प्रकरणातील सूत्रधारावर गुन्हा दाखल करा” नातेवाईक आक्रमक

Tuesday, 23 June 2026, 19:09

‘पान में पान चखना हो तो मीठा, तुफान को नाचते हुए देखना हो तो ईठा…’ ईठाचा दमदार टीझर रिलीज; श्रद्धा कपूरची तुफान एंट्री चर्चेत

Tuesday, 23 June 2026, 18:32
Next Post
A young man committed suicide by hanging himself due to mental, financial and physical distress in Sarola village, a case has been registered against 30 to 40 people

सारोळा गावात मानसिक, आर्थिक आणि शारीरिक त्रासामुळे तरुणाची गळफास घेऊन आत्महत्या, 30 ते 40 जणांवर गुन्हा दाखल  

  • About us
  • Privacy Policy
  • Grievance Redressal
  • Fact-Checking Policy
  • Ownership & Funding Info

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
Don`t copy text!
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.