मुंबई : काँग्रेस नेते आणि माजी केंद्रीय राज्यमंत्री मिलिंद देवरा यांनी काँग्रेस पक्षातील सदस्यत्वाचा राजीनामा दिल्यानंतर आता शिवसेना शिवसेनेत प्रवेश केला आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या उपस्थितीत देवरा यांनी शिवसेनेत प्रवेश केला.
मुंबईतील 10 माजी नगरसेवक, 25 पदाधिकाऱ्यांसह माजी खासदार मिलिंद देवरा यांनी शिवसेनेत प्रवेश केला आहे. मिलिंद देवरा यांच्या या निर्णयाने काँग्रेसला मोठा धक्का बसल्याचे मानले जात आहे. या पक्षप्रवेशासाठी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या वर्षा या शासकिय निवासस्थानी मोठी गर्दी झाली आहे.
दक्षिण मुंबई मतदारसंघावर ठाकरे गटाकडून दावा सांगण्यात आल्यानंतर काँग्रेस नेते नाराज असल्याच्या चर्चा सुरू होत्या. याच नाराजीतून काँग्रेस नेते मिलिंद देवरा यांनी काँग्रेसला सोडचिठ्ठी दिली आणि शिंदेंच्या शिवसेनेत प्रवेश केला आहे.
माजी केंद्रीय राज्यमंत्री श्री मिलिंदजी देवरा यांचा शिवसेनेत जाहीर पक्षप्रवेश
????️ 14-01-2024????मुंबई https://t.co/IA70SI8LiO
— Eknath Shinde – एकनाथ शिंदे (@mieknathshinde) January 14, 2024
दक्षिण मुंबई मतदारसंघावर ठाकरे गटाने दावा केल्यानंतर देवरा यांनी काँग्रेस नेते राहुल गांधी यांच्याशी संपर्क करण्याचा प्रयत्न केला. मात्र, पक्षनेत्यांनी त्याकडे दुर्लक्ष केले होते. यामुळे मिलिंद देवरा नाराज झाले होते. देवरा यांनी आपल्या समर्थकांना निवासस्थानी बोलावून काँग्रेसच्या प्राथमिक सदस्यत्वाचा राजीनामा देण्याचा विचार बोलून दाखविला. त्यानंतर त्यांनी आज सकाळी त्यांच्या सदस्यत्वाचा राजीनाम दिला. त्यानंतर एकनाथ शिंदे यांच्या उपस्थितीत शिवसेनेत पक्ष प्रवेश केला आहे.