मुंबई: महाराष्ट्रातील शेतकरी आणि नागरिकांसाठी अत्यंत महत्त्वाची बातमी आहे. आता जमिनीशी संबंधित कागदपत्रांसाठी सेतू केंद्रांमध्ये रांगा लावण्याची गरज भासणार नाही. महाराष्ट्र भूमी अभिलेख विभागाने एक क्रांतिकारी निर्णय घेत 7/12 उतारा , 8 अ, फेरफार नोंदी आणि ई-रेकॉर्ड्स यांसारखी महत्त्वाची कागदपत्रे थेट व्हॉट्सअॅपवर मिळवण्याची सुविधा सुरू केली आहे.

ही योजना 15 जुलै 2025 पासून प्रायोगिक स्वरूपात, आणि 1 ऑगस्ट 2025 पासून संपूर्ण राज्यभर लागू करण्यात येणार आहे.
अशी मिळवा सेवा…
- https://bhumiabhilekh.mahabhumi.gov.in](https://bhumiabhilekh.mahabhumi.gov.in या अधिकृत वेबसाइटवर जा.
2. आपला मोबाईल नंबर नोंदवा व OTP पडताळणी करा.
3. एकदाच 50 रुपये नोंदणी शुल्क भरावे लागेल.
4. नोंदणी पूर्ण झाल्यावर केवळ 15 रुपयांमध्ये विविध सेवा थेट व्हॉट्सअॅपवरून मिळू शकतील.
5. नोंदणी करताना जमिनीची मालकी असणे आवश्यक आहे.
या सेवा मिळणार…
- जमिनीचे कायदे, प्रक्रिया, हक्क, उपयोग याबाबत प्रश्नोत्तराच्या स्वरूपात मार्गदर्शन.
- सातबारा, 8 अ, फेरफार नोंदी, ई-रेकॉर्ड्स हे डिजिटल व प्रमाणित स्वरूपात व्हॉट्सअॅपवरून थेट डाउनलोड करता येणार.
- तुमच्या जमिनीच्या नोंदींमध्ये बदल झाल्यास तत्काळ सूचना व्हॉट्सअॅपवर मिळेल, त्यामुळे फसवणुक टाळता येईल.
या बदलांमुळे होणारे फायदे

१) दलालांची गरज नाही , थेट सेवा शासकीय प्लॅटफॉर्मवरून
२) शेतकऱ्यांना घरबसल्या कागदपत्रे , तेही स्वस्त दरात
३) डिजिटल प्रमाणित दस्तावेज, अधिक सुरक्षित आणि विश्वासार्ह
४) वेळ, पैसा आणि धावपळ वाचणार , शेतकऱ्यांच्या कामात गती
५) फसवणुकीला आळा, जमिनीच्या मालकीबाबत पारदर्शकता
1 ऑगस्टपासून लागू होणारी ही सेवा महाराष्ट्रातील डिजिटल भूमी व्यवस्थापनाच्या दृष्टीने ऐतिहासिक पाऊल ठरणार आहे.







