मुंबई: राज्यातील वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांच्या बदल्या करण्यात आल्या आहेत. भारतीय पोलीस सेवा आणि राज्य पोलीस सेवेतील 44 अधिकाऱ्यांच्या बदल्यांचे आदेश बुधवारी राज्य सरकारकडून जारी करण्यात आले आहेत. पुणे शहर पोलीस आयुक्त रितेश कुमार यांना पदोन्नती देत त्यांच्याकडे होमगार्डचे महासमादेश म्हणून जबाबदारी देण्यात आली आहे. नागपूर शहराचे पोलीस आयुक्त असणारे अमितेश कुमार हे आता पुणे शहराचे नवे पोलीस आयुक्त असणार आहेत.
तसेच वाहतूक विभागाचे अपर पोलीस महासंचालक रविंद्र कुमार सिंघल हे नागपूर शहराचे नवीन पोलीस आयुक्त असणार आहेत. गडचिरोली विभागाचे पोलीस उपमहानिरीक्षक संदीप पाटील यांना पदोन्नती देण्यात आली असून नक्षलविरोधी अभियानाचे विशेष पोलीस महानिरीक्षक म्हणून नियुक्त करण्यात आले आहे. अजयकुमार बन्सल हे जालना जिल्ह्याचे नवीन पोलीस अधीक्षक असणार आहेत.
बदलीमध्ये ‘या’ अधिकाऱ्यांचा समावेश
रितेश कुमार, अमितेश कुमार, प्रभात कुमार, रविंद्र कुमार सिंगल, शिरीष जैन, दीपक पांडे, दत्तात्रय कराळे, संजय शिंदे, प्रवीण कुमार, प्रवणीकुमार पडवळ, संजय दराडे, ज्ञानेश्वर चव्हाण, एस. डी. एनपुरे, एन.डी. रेड्डी, संदीप पाटील, विरेंद्र मिश्रा, रंजन कुमार शर्मा, नामदेव चव्हाण, राजेंद्र माने, विनिता साहु, एम. राजकुमार, अंकित गोयल, बसवराज तेली, शैलेश बलकवडे, शहाजी उमाप, एस.जी. दिवाण, संजय शिंत्रे, मनोज पाटील,, विक्रम देशमाने, पंकज देशमुख, एमसीव्ही महेश्वर रेड्डी, अजय कुमार बन्सल, रविंद्रसिंह परदेशी, रागसुधा आर., संदीप घुगे, मुमक्का सुदर्शन, धोंडोपंत स्वामी, पंकज कुमावत, मितेष घट्टे, विक्रम साळी, आनंद भोईटे, संदीप पखाले, रमेश धुमाळ व समाधान पवार यांचा समावेश आहे. बी.जी. शेखर यांची विशेष पोलिस महानिरीक्षक (नाशिक परिक्षेत्र) म्हणून बदली झाली आहे.