Maharashtra Politics: महाराष्ट्रात महायुतीतील तणाव दिवसेंदिवस वाढत असताना शिवसेना शिंदे गट आणि भाजपातील संघर्ष आता उघडपणे समोर येत आहे. स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर शिवसेना (शिंदे) गटातील काही नेत्यांनी अलीकडेच भाजपात प्रवेश केल्यानंतर (Bjp’s Operation Lotus) उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांनी नाराजी व्यक्त केली आहे. काही आमदारांनीही अशाच स्वरात प्रतिक्रिया दिल्यानंतर राजकीय वातावरण ढवळून निघाले आहे. (maharashtra latest political news)

शाह यांनी शिंदेना महत्त्व दिलं नाही
दरम्यान, शिंदे यांनी दिल्लीमध्ये केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांची भेट घेऊन भाजपाच्या वरिष्ठ नेतृत्वाविषयी तक्रारी मांडल्याची माहिती समोर आली आहे. मात्र, या बैठकीत शाह यांनी शिंदे यांच्या नाराजीला फारसे महत्त्व न दिल्याची चर्चा राजकीय वर्तुळात रंगली आहे.
हेही वाचा: धक्कादायक..! पोटच्या मुलाने बापाला संपवलं; घरात मृतदेह पुरला अन्…,
याच पार्श्वभूमीवर शिवसेना (उबाठा) गटाने गंभीर आरोप करत दावा केला की, भाजपा ‘ऑपरेशन लोटस’अंतर्गत शिवसेना (शिंदे) गटातील 35 आमदार तोडण्याच्या प्रयत्नात आहे. उबाठा गटाने म्हटले की सध्या सुरू असलेली ‘नाराजीचे नाटक’ ही फारशी गंभीर गोष्ट नसून, भाजपाच्याच कृपेने अस्तित्वात आलेल्या शिंदे गटाला आता उलटपक्षी भाजपच तोडण्याच्या प्रयत्नात आहे, अशी चिमटा काढणारी टीका करण्यात आली आहे.
उबाठा गटाची टीका
उबाठा गटाच्या म्हणण्यानुसार, शिंदे यांनी दिल्लीत शाह यांच्याकडे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि भाजपा प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण यांची तक्रार केली. हे दोघेही ‘पैसे वापरून आमचे पदाधिकारी पळवून नेत आहेत’ असे शिंदेंनी सांगितल्याचा दावा करण्यात आला. त्यावर शाह यांनी ‘हा पक्ष तुम्ही नाही, आम्हीच घडवला, आणि तुम्ही फुटला म्हणून तुम्हाला पक्ष म्हणून मान्यता दिली,’ अशी कठोर प्रतिक्रिया दिल्याचे उबाठा गटाचे म्हणणे आहे.
हेही वाचा: आपल्या मुली सुरक्षित नाहीत? ‘त्या’ नराधमाला कठोर शिक्षा..; नागरिक संतप्त
उद्धव ठाकरे यांची भाजपावर जोरदार टीका
दरम्यान, शिवसेना (उबाठा) पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनीही भाजपावर जोरदार टीका केली आहे. भाजपाचा हिंदुत्वाचा फुगा फुटला असून पक्ष भाषिक प्रांतवादाचा विषारी प्रचार करत असल्याचा आरोप त्यांनी केला. “मातोश्री परिसरात मोठ्या प्रमाणावर होणारे प्रवेश हे केवळ गर्दी नसून लढणाऱ्या शिवसैनिकांचे सैन्य आहे,” असे ठाकरेंनी म्हटले.
गेलेले अनेक जण पुन्हा परतत…
ते पुढे म्हणाले, “आपल्यातून गेलेले अनेक जण पुन्हा परतत आहेत. भाजपाचे आणि गद्दारांचे ढोंग आता सर्वांना दिसू लागले आहे. मात्र ही लढाई सोपी नाही. भाजपा हा कपट आणि कारस्थान करणारा पक्ष असून आता पक्ष फोडण्यापलीकडे घरे देखील फोडण्याचे प्रयत्न सुरू आहेत.”
महाराष्ट्रातील सत्तासंघर्ष आणि राजकीय स्थित्यंतरांच्या पार्श्वभूमीवर या आरोप-प्रत्यारोपांच्या मालिकेमुळे राज्यातील राजकारण पुन्हा एकदा ढवळून निघाले आहे.
हेही वाचा: पुणे आयटीत नोकरकपातीची टांगती तलवार! पण, ‘हे’ 4 स्किल असतील तर नोकरी…







