मुंबई : मंगळवारी झालेल्या दसरा मेळाव्यानंतर आज मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे दिल्ली दौऱ्यावर रवाना झाले आहेत. काही वेळेपूर्वीच एकनाथ शिंदे आणि देवेंद्र फडणवीस हे मुंबई विमानतळावरून दिल्लीकडे रवाना झाले आहेत. अचानकपणे दिल्ली दौऱ्यावर गेल्याने राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण आले आहे. तर, राजचे दुसरे उपमुख्यमंत्री अजित पवार हे मात्र मुंबईत असल्याची माहिती समोर आली आहे.