Thursday, April 2, 2026
  • Login
Pune Prime News
Download Android App
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
Pune Prime News
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
  • English

Land Registration: जमीन व्यवहारांबद्दल सर्वोच्च न्यायालयाचा ऐतिहासिक निकाल! आता जमीन मालकांची मनमानी संपली; हप्ते भरायला उशीर झाला तर… लगेच वाचा

ASHLESHA MASKEby ASHLESHA MASKE
Tuesday, 23 December 2025, 20:41
Land Registration: Historic verdict of the Supreme Court on land transactions! Now the arbitrariness of land owners is over; If there is a delay in paying the installments... Read immediately

मुंबई: जमीन व्यवहारांबाबत (Land Registration) देशभरात महत्त्वाचा ठरणारा निकाल सर्वोच्च न्यायालयाने दिला आहे. जमीन खरेदी-विक्रीच्या व्यवहारात ठरलेल्या मुदतीत पैसे (Property Registration) भरण्यास थोडा विलंब झाला म्हणून (Land Buying) तो व्यवहार किंवा न्यायालयाचा आदेश (7/12 Utara) आपोआप रद्द ठरवता येत नाही, असे सर्वोच्च न्यायालयाने स्पष्ट केले आहे. तसेच खरेदीदार हा करार पूर्ण करण्यासाठी सातत्याने तयार आणि इच्छुक आहे का, हे त्याच्या एकूण वर्तनावरून ठरवले पाहिजे, असेही न्यायालयाने नमूद केले आहे. या निर्णयामुळे देशातील अनेक प्रलंबित जमीन व्यवहार प्रकरणांवर परिणाम होण्याची शक्यता आहे. (Latest Marathi News)

 

या प्रकरणाची पार्श्वभूमी पाहता, सन 2004 मध्ये एका भूखंडाचा सुमारे 9.05 लाख रुपये किंमतीचा खरेदी-विक्री करार करण्यात आला होता. काही कारणांमुळे खरेदीदार आणि जमीन मालक यांच्यात वाद निर्माण झाला. हा वाद कनिष्ठ न्यायालयात गेला. दीर्घ सुनावणीनंतर 2011 मध्ये कनिष्ठ न्यायालयाने खरेदीदाराच्या बाजूने निकाल देत उर्वरित रक्कम दोन महिन्यांच्या आत भरून खरेदीखत करून घेण्याचे आदेश दिले. मात्र या निर्णयाविरोधात जमीन मालकाने उच्च न्यायालयात अपील दाखल केले.

उच्च न्यायालयात हे प्रकरण अनेक वर्षे प्रलंबित राहिले आणि अखेर 2016 मध्ये कनिष्ठ न्यायालयाचा निर्णय कायम ठेवण्यात आला. या दरम्यान खरेदीदाराकडून पैसे भरण्यास थोडा विलंब झाला. याच मुद्द्यावरून जमीन मालकाने व्यवहार रद्द ठरतो, असा दावा केला आणि पुन्हा न्यायालयीन लढाई सुरू झाली.

या प्रकरणावर सुनावणी करताना उच्च न्यायालयाच्या न्यायमूर्ती सुधांशू धुलिया आणि संजय करोल यांच्या खंडपीठाने महत्त्वपूर्ण निरीक्षण नोंदवले. न्यायालयाने सांगितले की, कनिष्ठ न्यायालयाने दिलेल्या मुदतीत पैसे न भरणे म्हणजे कराराचा त्याग किंवा करार पूर्ण करण्यास नकार असे सरसकट मानता येत नाही. खरेदीदाराचे एकूण वर्तन महत्त्वाचे ठरते. तो व्यवहार पूर्ण करण्यासाठी प्रयत्नशील आहे का, अंमलबजावणीसाठी अर्ज दाखल केला आहे का, पैसे भरण्याची तयारी दाखवली आहे का, हे सर्व घटक निर्णायक ठरतात.

तसेच, अपिलीय न्यायालयाने कनिष्ठ न्यायालयाचा निर्णय कायम ठेवल्यास तो आदेश वरिष्ठ न्यायालयाच्या आदेशात विलीन होतो. अशा परिस्थितीत केवळ मुदतीत थोडा विलंब झाला म्हणून संपूर्ण निकाल अवैध ठरवता येत नाही, असे सर्वोच्च न्यायालयाने स्पष्ट केले. या प्रकरणात खरेदीदाराने व्यवहार पूर्ण करण्याची इच्छा सातत्याने दाखवली असल्याचे न्यायालयाच्या निदर्शनास आले.

उच्च न्यायालयाचा विलंबाच्या आधारे दिलेला निर्णय सर्वोच्च न्यायालयाने रद्द केला असून कनिष्ठ न्यायालयाच्या आदेशाची तातडीने अंमलबजावणी करण्याचे निर्देश दिले आहेत. हा निकाल जमीन व्यवहारांमध्ये व्यवहारिक वास्तव आणि न्यायसंगत दृष्टीकोन स्वीकारणारा मानला जात असून भविष्यातील अनेक प्रकरणांसाठी तो मार्गदर्शक ठरण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.

 

ASHLESHA MASKE

ASHLESHA MASKE

ताज्या बातम्या

'I was going to send her to school today': Grandmother's lament for her beloved granddaughter in Pune; Unknown person kills toddler in her sleep...

‘आज तिला शाळेत घालणार होते हो’ पुण्यात लाडक्या नातीसाठी आजीचा आकांत; अज्ञात व्यक्तीने झोपेतच चिमुकलीला संपवलं…

Thursday, 2 April 2026, 19:40
pune

Pune : दत्तात्रय भरणे यांचा पावसातच धडाकेबाज दौरा! मुसळधार पाऊस, गारपीटीत कृषिमंत्री थेट बांधावर, नुकसानग्रस्त पिकांची पाहणी..

Thursday, 2 April 2026, 19:35

पोलीस की नराधम! ‘तुझ्या मुलीला माझ्याकडे पाठव पैसे देईन’ म्हणत महिलेकडे शरीरसुखाची मागणी; नराधम अधिकारी गजाआड

Thursday, 2 April 2026, 18:42

सुनेत्रा पवारांचा दिल्ली दौरा आणि दिग्गज नेत्यांची दांडी! तटकरेंनी दिलं स्पष्टीकरण, पण पत्रातील ‘त्या’ घोळामुळे चर्चांना उधाण

Thursday, 2 April 2026, 17:53

‘दादा हे मला त्रास देतात’ बहिणीची छेड काढणाऱ्यांचा भावाने घेतला बदला; थंड डोक्याने खुनाचा कट रचला अन् भरदिवसा गोळीबार करत…

Thursday, 2 April 2026, 17:51

Ranjangao ganapati : शिरुरला ढोल ताशांच्या गजराने बगाडाला रंगत 

Thursday, 2 April 2026, 17:36
Next Post
Pune Traffic Diversion: Punekars, pay attention! Big changes in traffic in the camp area on the occasion of Christmas; No-entry on 'these' routes, read the rules before leaving the house

Pune Traffic Diversion: पुणेकर लक्ष द्या! ख्रिसमस निमित्त कॅम्प परिसरातील वाहतुकीत मोठे बदल; 'या' मार्गांवर नो-एन्ट्री, घराबाहेर पडण्यापूर्वी नियम वाचा

  • About us
  • Privacy Policy
  • Grievance Redressal
  • Fact-Checking Policy
  • Ownership & Funding Info

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
Don`t copy text!
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.