मुंबई : गेल्या काही दिवसांपासून राज्यात मराठी-हिंदी भाषा वाद भडकला असून, मनसे कार्यकर्त्यांकडून राज्यात मराठीचं बोलली गेली पाहिजे असा आग्रह धरला जात आहेत. सोशल मीडियावर असे अनेक व्हिडिओ समोर येत आहेत, ज्यामध्ये मनसे कार्यकर्त्यांकडून हिंदी भाषिकांना मारहाण केली जात असल्याचं समोर आलं आहे. यावरून अनेक नेते कलाकार आपली प्रतिक्रिया देत असून, हिंदी भाषिकांची बाजू घेताना दिसत आहेत.

एकीकडे भाषा वादाविरुद्ध ठाकरे बंधूंनी एकत्र येत मराठीच्या मुद्द्यावरुन आक्रमक भूमिका घेतली आहे. तर दुसरीकडे विरोधकांकडून ठाकरे बंधूंवर टीका केली जात आहे. अशातच बिग बॉस स्पर्धक हिंदूस्तानी भाऊ याने देखील म्हणजे हिंदी भाषिकांची बाजू घेत मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांना एक विनंती केली आहे. हिंदूस्तानी भाऊने आपल्या इन्स्टाग्रामवर एक व्हिडीओ शेअर करत भाषा वादावर आपले मत मांडत परप्रातीयांसोबत अशी वागवून चुकीची असल्याचं म्हंटल आहे.
हिंदूस्तानी भाऊ आपल्या बोलत आहे की, ‘जय महाराष्ट्र… हा जय महाराष्ट्र आहे मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांना.. साहेब छत्रपती शिवाजी महाराजांच्या पावननगरीमध्ये, या महाराष्ट्रामध्ये मराठी भाषेचा गर्वच नाही तर माज आहे, असं बोललं जातंय. मराठी असल्याचा गर्वच नाही तर माज आहे. पण साहेब मराठीच्या नावावर इथे आलेल्या हिंदुस्तानातील लोकांना, आपल्या हिंदू लोकांना मारणे चुकीचं आहे. शाळेत असो किंवा कॉलेजमध्ये मराठी भाषा शिकवलीच पाहिजे. ज्यासाठी जेवढी ताकद लावायची आहे, तेवढी लावा.. पूर्ण हिंदू समाज तुमच्याबरोबर आहे. गोरगरिबांना मारणे चुकीचं आहे. कारण ते आज इथे नोकरी करण्यासाठी आले आहेत. महाराष्ट्रातील अनेक लोकं देखील वेगवेगळ्या राज्यांमध्ये शिकायला गेली आहेत. काम करायला गेली आहेत. तेथील लोकं हे सगळं पाहत आहेत की आपल्या लोकांना मारलं जातंय. तिथल्या लोकांनी आपल्या मराठी माणसांबरोबर असं केलं. तेव्हा आपण काय करणार? कोणाला मारणं खूप सोपं असतं. पण एकत्र आणणे खूप अवघड असते. हिंदूत्वाला एकत्र आणा साहेब…बाळासाहेबांची सावली राजसाहेबांमध्ये पाहिली जाते. इथे जमलेल्या माझ्या तमाम हिंदू बांधवांनो भगिनींनो आणि मातांनो..असं ऐकल्यावर अंगावर काटा येतो.’ हिंदुस्थानी भाऊचा हा व्हिडिओ सोशल व्हायरल झाल्यानंतर नेटकरी यावर भरभरून कमेंट करत आहेत. काहीजण हिंदुस्थानी भाऊला ट्रोल करत आहेत. तर काहीजण त्याच्या बाजूने उभे आहेत.







