मुंबई : मुंबईमधील चेंबूरमधून धक्कादायक समोर आली आहे. येथे शरीरसंबंधासाठी बायकोने नकार दिल्यामुळे नवऱ्याने रागातून बायकोच्या अंगावर रॉकेल टाकून पेटवून देण्याचा प्रयत्न केल्याची घटना घडली आहे. ही घटना चेंबूरमधील वाशी नाका येथे घडली आहे. याप्रकरणी पोलीसांत गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, 30 मे 2025 रोजी मुंबईतील चेंबूरमधील वाशी नाका परिसरात एका ३८ वर्षीय महिलेला तिच्या पतीने शारीरिक संबंध ठेवण्यास नकार दिल्याच्या रागातून रॉकेल अंगावर ओतून पेटवून दिले. या धक्कादायक घटनेत महिला ७० टक्के भाजली आहे. पिडीत महिलेवर सायन येथील रूग्णालयात उपचार सुरू आहेत. डॉक्टरांनी महिलेची प्रकृती अत्यंत गंभीर असल्याचं सांगितलं आहे.
याप्रकरणी, चेंबूर नाका पोलिसांनी आरोपी नवऱ्याविरुद्ध हत्येचा प्रयत्न आणि घरगुती हिंसाचारासह विविध कलमांखाली गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलिसांनी आरोपीला ताब्यात घेतले असून, या प्रकरणाचा तपास पोलिसांकडून सुरू आहे.







