Gold Silver Rate Today : मुंबई : सोन्या-चांदीच्या किंमती वर्षाच्या शेवटच्या दिवसांत घसरल्या आहेत. शुक्रवारी सोने 350 रुपयांनी स्वस्त झाले. सलग दोन दिवस सोन्याच्या दरात घसरण झाली. यापूर्वी 28 डिसेंबर 2023 रोजी सोने 64,250 रुपये होते. शुक्रवारी सोन्याने सर्वोच्च पातळी गाठली होती.
वर्षाच्या शेवटी सोने-चांदीच्या दरात दिलासा
आज म्हणजेच शनिवारी, 30 डिसेंबरला सोन्याच्या दरात घट झाली आहे. देशातील बहुतांश शहरांमध्ये सोन्याचा दर 63,870 रुपये प्रति 10 ग्रॅम पर्यंत पोहोचला आहे. आज 22 कॅरेट सोन्याचा दर 58,550 रुपये आहे. आहे. 28 डिसेंबर रोजी सोन्याच्या दराने आतापर्यंतचा उच्चांक गाठला होता.
आज पुण्यात 24 कॅरेट शुद्ध सोन्याचा दर 63870 रुपये प्रति 10 ग्रॅम नाशकात 24 कॅरेट सोने 63900 रुपये प्रति 10 ग्रॅम आहे. नागपूरात 24 कॅरेट सोने 63870 रुपये प्रति 10 ग्रॅम आहे. कोल्हापूरात 24 कॅरेट सोने 63870 रुपये प्रति 10 ग्रॅम आहे.
आज सोन्याच्या दरात घसरण
गुडरिटर्न्स वेबसाईटनुसार, आज सोन्याची किंमत किंचित घसरली आहे. आज 22 कॅरेट सोन्याचा दर 5,855 रुपये प्रति ग्रॅम आणि 24 कॅरेट सोन्याचा दर 6,387 रुपये प्रति ग्रॅम आहे. आज 18 कॅरेट सोन्याचा दर 47,900 रुपये प्रति 10 ग्रॅम आहे तर, 24 कॅरेट सोन्याचा दर 63,870 रुपये प्रति 10 ग्रॅम आहे.
चांदीच्या दरात 300 रुपयांची वाढ
आज शनिवारी चांदीचा भाव 300 रुपयांनी वाढला असून चांदीचा दर 78,600 रुपयांवर पोहोचला आहे. शुक्रवारी मुंबई आणि दिल्लीत चांदीचा दर 1200 रुपयांनी घसरून 78,300 रुपयांवर आला होता. चेन्नईमध्ये एक किलो चांदीचा दर 80,000 रुपये आहे. चेन्नईमध्ये चांदीची किंमत देशात सर्वाधिक आहे.