मुंबई : गेल्या दोन दिवसांच्या घसरणीनंतर आज सोन्याच्या दराच किचिंत वाढ झाल्याच पहायला मिळत आहे. तर चांदीत घसरण कायम आहे. आज सोन्याच्या भावात २० रुपयांची वाढ झाली आहे. जानेवारी महिन्याच्या पहिल्या आठवड्यात सोन्याचा भाव गगनाला पोहोचला होता. परंतु शेवटच्या दिवशी शनिवारी सोन्याच्या भावात किंचित वाढ झालेली पाहायला मिळाली.
२४ कॅरेटनुसार प्रमुख शहरातील आजचा भाव किती ते जाणून घेऊयात, मुंबईत ६३,२७० रुपये, पुण्यात ६३,२७० रुपये, नागपूर ६३,२७० रुपये, नाशिक ६३,३०० रुपये, ठाणे ६३,२७० रुपये, अमरावती ६३,२७० रुपये आहे.
आज गुड रिटर्न्सच्या वेबसाइटनुसार २२ कॅरेट सोने १ ग्रॅमसाठी ५,८१५ रुपये मोजावे लागणार आहे. तसेच २४ कॅरेटनुसार १० ग्रॅमसाठी ६३,४२० रुपये मोजावे लागतील. आज सोन्याच्या भावात २० रुपयांनी वाढ झाली आहे. चांदीच्या किमतीही घसरल्या आहेत. प्रतिकिलो चांदीसाठी आज ७६,६६० रुपये मोजावे लागतील.
पुढच्या काही दिवसांत सोन्याचा दर हा ७२ हजारांच्या पार जाऊ शकतो. तर चांदीच्या किमतीही वाढू शकतात. असे मत तज्ञांनी मांडले आहे. आंतरराष्ट्रीय बाजारात सोने प्रति 2,058 डॉलरच्या जवळपास आहे. फेडरल रिझर्व्हच्या नव्या धोरणामुळे यूएस शेअर बाजार आणि जागितक पातळीवर सोन्या-चांदीच्या दरावर वाढ दिसून येत आहे. देशातंर्गत होणाऱ्या शेअर बाजारातील चढउतार आणि भू-राजकीय परिस्थितीमुळे सोन्याच्या किमतीवर परिणाम झाला आहे.