मुंबई : गेल्या दहा दिवसांपासून सोने-चांदीच्या दरात मोठी घसरण होत आहे. त्यामुळे ग्राहकांना मोठा दिलासा मिळत आहे. परिणामी सराफा बाजाराकडे आपोआप ग्राहकांची पावलं वळली आहेत. डिसेंबरमध्ये उच्चांकी कामगिरी केल्यामुळे ग्राहकांचा हिरमोड झाला होता. ग्राहक आता सोन्याला पर्याय म्हणून प्लॅटिनम खरेदी करत आहेत. या वर्षी 3 जानेवारीपासून सोने आणि चांदीत घसरणीचे सत्र सुरु होते. या दहा दिवसांत सोने 1300 रुपयांनी तर चांदी 3100 रुपयांनी घसरली आहे. काय आहेत सोने-चांदीचा भाव पाहूयात.
नवीन वर्षाच्या सुरुवातीचे दोन दिवस सोने वधारले. त्यानंतर जवळपास दहा दिवस सोन्यात घसरण झाली. 3 जानेवारीपासून सोने उतरले. 4 जानेवारीला सोने 440 रुपये, 5 जानेवारीला सोने 130 रुपये, 8 जानेवारीला सोन्याच्या किंमती 220 रुपयांनी उतरल्या. 9 जानेवारीला 100 रुपयांनी, तर 11 जानेवारी रोजी सोन्याचे भाव तेच राहीले. तर 12 जानेवारी रोजी किंमतीत 100 रुपयांची वाढ झाली. गुडरिटर्न्सनुसार, आता 22 कॅरेट सोने 57,850 रुपये प्रति 10 ग्रॅम तर 24 कॅरेट सोन्याचा भाव 63,100 रुपये प्रति 10 ग्रॅम आहे.
गुडरिटर्न्सनुसार, एक किलो चांदीचा भाव 76,500 रुपये आहे. या वर्षाच्या सुरुवातीपासूनच चांदीत नरमाई दिसून आली. 3 जानेवारीला 300 रुपयांनी चांदी घसरली, 4 जानेवारीला 2000 रुपयांनी चांदी घसरली, 8 जानेवारीला 200 रुपयांनी चांदीच्या किंमती घसरल्या. 10 जानेवारी रोजी किंमतीत 600 रुपयांची घसरण झाली.
गुडरिटर्न्सनुसार, सोने महागले तर चांदी स्वस्त झाली. 24 कॅरेट सोने 62,515 रुपये, 23 कॅरेट 62,265 रुपये, 22 कॅरेट सोने 57264 रुपये झाले. 18 कॅरेट 46,886 रुपये, 14 कॅरेट सोने 36,571 रुपये प्रति 10 ग्रॅमवर पोहचले. एक किलो चांदीचा भाव 76,500 रुपये झाला. वायदे बाजारात आणि आंतरराष्ट्रीय बाजारात सोने आणि चांदीवर कुठलाही कर, शुल्क नसतो. तर सराफा बाजारात शुल्क आणि कराचा समावेश होत असल्याने भावात तफावत दिसून येते.