मुंबई: अतिवृष्टी, पूर, चक्रीवादळ या नैसर्गिक आपत्तीत नुकसान झालेल्या राज्यातील १ लाख २४ हजार ७१५ बाधित शेतकऱ्यांना राज्य शासनाकडून सुमारे ६९ कोटी इतका निधी मंजूर केला. या नैसर्गिक आपत्तीत सुमारे ६८९२६ हेक्टर क्षेत्र बाधित झाले असून, शेतपिकाचे नुकसान झाले असून महसूल विभागाकडून या संदर्भातील शासन निर्णय नुकताच जारी केला.
राज्यातील नागपूर, पुणे, छत्रपती संभाजीनगर, नाशिक आणि कोकण परिसरातील शेतकऱ्यांना जून २०२४ ते ऑगस्ट २०२४ या कालावधीत नैसर्गिक आपत्तीचा फटका सहन करावा लागला. अतिवृष्टीमुळे झालेल्या शेतपिकांच्या नुकसानीपोटी शेतकऱ्यांना राज्य शासनाने मदतीचा दिला आहे. राज्यातील या पाच विभागीय आयुक्तालय क्षेत्रात एकूण १२९९९.८७ इतके हेक्टर बाधित झाले असून, ३५ हजार ४५८ बाधित शेतकऱ्यांचा समावेश आहे. या विभागासाठी २३ कोटी ७२ लाख ९३ लक्ष इतका निधी मंजूर करण्यात आला आहे.
नागपूरला सर्वाधिक फटका
नैसर्गिक आपत्तीचा सर्वाधिक फटका नागपूर विभागाला बसला असून, ३८३७.९८ हेक्टर क्षेत्र बाधित झाले असून, ८६८५ शेतकऱ्यांचे नुकसान झाले आहे. त्यांना ८०१.०६ लक्ष निधी मंजूर झाला आहे. त्याखालोखाल कोकण विभागात ३१५७.१५ हेक्टर क्षेत्र बाधित झाले असून, नुकसानग्रस्त शेतकऱ्यांची संख्या सर्वाधिक १३,७१५ इतकी आहे. कोकणाला ३११.५७ लक्ष इतका निधी मंजूर झाला आहे. छत्रपती संभाजीनगरात २६०० हेक्टर क्षेत्र बाधित झाले असून, बाधित शेतकऱ्यांची संख्या ५०११ आहे. त्यांना ३५३.६० लक्ष निधी मंजूर झाला आहे. नाशिक विभागात २२८७ हेक्टर क्षेत्र बाधित झाले असून ३७३६ शेतकरी बाधित झाले आहेत. नाशिकला ६९१.५० लक्ष निधी मंजूर करण्यात आला आहे. पुणे विभागात १११६.८१ हेक्टर बाधित झाले असून, ४०४८ शेतकरी बाधित झाले आहेत. पुण्यासाठी ३५३.६० लक्ष निधी मंजूर झाला आहे.
तसेच मार्च २०२४ ते में २०२४ या कालावधीत चंद्रपूर, पुणे, सातारा, सांगली, सोलापूर या परिसरात अवेळी पावसामुळे झालेल्या शेतपिकांच्या नुकसानीसाठी ४४ कोटी ७४ लाख २५ हजार इतका निधी मंजूर
करण्यात आला आहे. १३०७९. ९० हेक्टर क्षेत्र बाधित झाले असून, २०६४४ शेतकरी बाधित झाले आहेत. नागपूर विभागात २०२६ ते पुणे विभागात १८६१८ बाधित शेतकऱ्यांचा समावेश आहे. फेब्रुवारी २०२४ मध्ये अमरावती विभागातील यवतमाळ व बुलढाणा जिल्ह्यांतील अवकाळी पावसामुळे शेतपिकांच्या नुकसानीसाठी ९३४०.२३ लक्ष इतका निधी शासनाने मंजूर केला आहे. यवतमाळ परिसरात ९००४,४० हेक्टर क्षेत्र बाधित झाले असून, ११३७३ शेतकरी बाधित झाले आहेत. तर बुलढाणा येथील ३३८४४. ४९ हेक्टर क्षेत्र बाधित इसले असून, ५७.२४० शेतकरी बाधित झाले आहेत.