Wednesday, August 19, 2026
  • Login
Pune Prime News
Download Android App
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
Pune Prime News
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
  • English

नेव्ही नगरच्या घरात चौघे मृत अन् मोबाईलमधला डेटा गायब, मृत्यूचं गूढ अधिकच गडद; तपासात धक्कादायक माहिती आली समोर

Shreya Varkeby Shreya Varke
Tuesday, 18 August 2026, 8:22

मुंबई : कुलाब्यातील नेव्ही नगर परिसरात नौदल जवान, त्याची पत्नी आणि दोन मुलांच्या मृत्यूने खळबळ उडाली आहे. 15 ऑगस्ट 2026 रोजी नौदलाच्या निवासी वसाहतीतील घरात चौघांचे मृतदेह आढळले होते. मृत जवानाची ओळख पुरणमल शंभूलाल मेहरा (30) अशी झाली असून त्यांची पत्नी ओमा मेहरा (28), तीन वर्षांचा मुलगा यश आणि दोन महिन्यांचा मुलगा दर्श यांचा मृत्यू झाला. प्राथमिक तपास आणि शवविच्छेदन अहवालाच्या आधारे पुरणमलने कुटुंबातील तिघांची हत्या केल्यानंतर आत्महत्या केल्याचा संशय व्यक्त करण्यात आला आहे.

पोलिसांना घटनास्थळी पुरणमलचा मृतदेह हॉलमध्ये नायलॉनच्या दोरीने गळफास घेतलेल्या अवस्थेत सापडला. पत्नी आणि दोन्ही मुले बेडवर मृतावस्थेत होती. प्राथमिक माहितीनुसार, पत्नी ओमा आणि लहान मुलाचा उशीने गुदमरवून जीव घेतल्याचा संशय आहे. मोठ्या मुलाला विषारी पदार्थ देण्यात आल्याची शक्यता तपासली जात असून त्यासाठी तज्ज्ञांच्या अहवालाची प्रतीक्षा आहे. घटनास्थळी कोणतीही सुसाइड नोट मिळालेली नसल्याचे पोलिसांनी सांगितले आहे.

या प्रकरणाच्या तपासात आणखी काही महत्त्वाची माहिती समोर आली आहे. घटनेच्या आदल्या रात्री, म्हणजे 14 ऑगस्ट रोजी सुमारे 11 वाजता पुरणमलने आपल्या वडिलांना “आमचे मृतदेह घेऊन जा” असा WhatsApp संदेश पाठवला होता. मात्र हा संदेश दुसऱ्या दिवशी सकाळी कुटुंबीयांनी पहिला. त्यानंतर नौदलाच्या नियंत्रण कक्षाला माहिती देण्यात आली. पुरणमलने स्वतःचा आणि पत्नीचा मोबाइल फॉरमॅट केल्याचेही तपासात आढळले असून, पोलिस डिलीट झालेला डेटा परत मिळवण्याचा प्रयत्न करत आहेत.

पुरणमलवर INHS अश्विनी रुग्णालयात उपचार सुरू होते आणि तो आजारी रजेवर होता. कौटुंबिक वाद, आर्थिक अडचणी आणि मानसिक अस्वस्थता या विविध बाजूंनी पोलिस तपास करत आहेत. याप्रकरणी आतापर्यंत 8 जणांचे जबाब नोंदवण्यात आले आहेत. त्यात नातेवाईक, डॉक्टर, मित्र आणि घरकाम करणाऱ्या महिलेचा समावेश आहे. काही काळापूर्वी वडील आणि सासरे पुरणमलला समजावण्यासाठी मुंबईत आले होते. त्यावेळी झालेल्या वादात त्याने पत्नीचा मोबाइल जमिनीवर आपटल्याची माहितीही तपासात समोर आली आहे. दरम्यान, नेमकं काय घडलं होतं याप्रकरणी अधिक तपास सुरु असून  कफ परेड पोलिसांकडून या संपूर्ण प्रकरणाचा सखोल तपास सुरू आहे. उपलब्ध पुरावे आणि अहवालांच्या आधारे पुढील कारवाई केली जाणार आहे.

 
Shreya Varke

Shreya Varke

ताज्या बातम्या

मनोज जरांगे पाटील यांचा सरकारला सज्जड दम; २९ ऑगस्टपासून अंतरवाली सराटीत पुन्हा आमरण उपोषण

Wednesday, 19 August 2026, 22:18

भोर पंचायत समिती सभापतींच्या पुढाकाराने भोर-महाड रस्त्यावरील खड्डे भरण्याला सुरुवात; अपूर्ण मोऱ्यांची कामे लवकरच होणार, नागरिकांनी सोडला सुटकेचा निःश्वास

Wednesday, 19 August 2026, 22:16

शिंदेवाडी पुलाखाली ट्रकची दुचाकीला पाठीमागून धडक; तरुणीचा मृत्यू, दोघे जखमी

Wednesday, 19 August 2026, 22:06

भोंगवलीत घरासमोर पार्क केलेली दुचाकी चोरीला; अज्ञात चोरट्याविरुद्ध गुन्हा दाखल

Wednesday, 19 August 2026, 21:51

गाऊडदरा येथे जमिनीच्या वादातून मारहाण; दोन्ही बाजूंकडून परस्परविरोधी तक्रारी दाखल

Wednesday, 19 August 2026, 21:48

दौंड हादरले! रक्ताच्या थारोळ्यात मृतदेह अन शिर गायब; रेल्वे वसाहतीतील घटनेने शहर सुन्न

Wednesday, 19 August 2026, 21:27
Next Post

हत्या केली अन् 18 तास मृतदेहासमोरच बसून राहिली प्रेयसी; सियापेक्षा भयंकर निघाली, असा काढला काटा

  • About us
  • Privacy Policy
  • Grievance Redressal
  • Fact-Checking Policy
  • Ownership & Funding Info

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
Don`t copy text!
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.