मुंबई : महायुतीत भाजप, शिवसेनेनंतर आता राष्ट्रवादीने विधानसभा निवडणुकीसाठी पहिली यादी जाहीर केली आहे. उमेदवारांच्या पहिल्या यादीमध्ये उपमुख्यमंत्री अजित पवार यांना बारामतीतून उमेदवारी देण्यात आली आहे. परंतु राज्यभर चर्चेत असणाऱ्या शिरूर-हवेली विधानसभा मतदारसंघाबाबत मात्र अजून कोणती घोषणा केलेली नाही, तर या मतदारसंघात उमेदवार कोण असणार? हे अद्याप गुलदस्त्यातच ठेवण्यात आले आहे.
उपमुख्यमंत्री अजित पवार, प्रफुल्ल पटेल आणि सुनिल तटकरे यांनी पत्रकार परिषद घेत यादी जाहीर केली. संसदीय मंडळाच्या सदस्यांची बैठक झालीया सून आज काही जागांवरील उमेदवार घोषित करण्यात येत आहेत असं तटकरे यांनी म्हटलं.
राष्ट्रवादी अजित पवार गटाची पहिली उमेदवार यादी पुढीलप्रमाणे..
- बारामती- अजित पवार
- आंबेगाव- दिलीप वळसे पाटील
- अमरावती- सुलभा खोडके
- इंदापूर- दत्तात्रय भरणे
- पिंपरी- अण्णा बनसोडे
- पाथरी- निर्मला विटेकर
- मावळ – सुनील शेळके
- येवला- छगन भुजबळ
- कागल- हसन मुश्रीफ
- सिन्नर – माणिकराव कोकाटे
- श्रीवर्धन – अदिती तटकरे
- उदगीर- संजय बनसोडे
- अर्जुनी मोरगाव- राजकुमार बडोले
- माजलगाव- प्रकाश सोळंखे
- वाई – मकरंद पाटील
- खेड आळंदी- दिलीप मोहिते पाटील
- अहमदनगर – संग्राम जगताप
- इंदापूर- दत्तात्रय भरणे
- अहमदपूर- बाबासाहेब पाटील
- कळवण- नितीन पवार
- कोपरगाव- आशुतोष काळे
- अकोले- किरण लहामटे
- वसमत – राजू नवघरे
- चिपळूण- शेखर निकम
- जुन्नर- अतुल बेनके
- मोहोळ- यशवंत माने
- हडपसर- चेतन तुपे
- देवळाली- सरोज अहिरे
- चंदगड- राजेश पाटील
- इगतपुरी – हिरामण खोसकर
- तुमसर – राजू कारेमोरे,
- पुसद – इंद्रनील नाईक
- अमरावती शहर – सुलभा खोडके
- नवापूर – भरत गावित
- पाथरी – निर्मला विटेकर
- मुंब्रा-कळवा – नजीब मुल्ला
- अहेरी – धर्मराव बाबा अत्राम
- अंमळनेर – अनिल भाईदास पाटील