मुंबई : राज्यात मुलींवर होणाऱ्या अत्याचाराच्या घटनेमध्ये दिवसेंदिवस वाढच चालल्या आहेत. अशातच बाप-लेकीच्या नात्याला काळीमा फासणारी धक्कादायक घटना मुंबईजवळील नालासोपारा परिसरातून समोर येत आहे. नालासोपाऱ्यात एका नराधम बापानेच आपल्या २२ वर्षीय मुलीला बदनामीची धमकी देत तिच्यावर सातत्याने अत्याचार केला असल्याचं उघडकीस आलं आहे. मुलीच्या मृत्यूनंतर तिच्या आईने पोलिसांत तक्रार दिल्यानंतर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. (Nalasopara Crime News)
दरम्यान, नराधम बाप पीडित मुलीला बळजबरीने घरात बांधून ठेवून मारहाण करत. हा प्रकार कोणाला सांगितला, तर जिवे मारण्याची धमकी देखील दिली होती. या धमकीमुळे पीडित तरुणी आणि तिची आई भीतीपोटी गप्प बसल्या होत्या. मात्र हा प्रकार सुरूच राहिला. याकाळात पीडीत तरुणी गर्भवती झाली होती. मात्र त्याने बळजबरीने तिचा गर्भपातही केला होता.
मुलीच्या मृत्यूनंतर तिच्या आईने आपल्या मुलीला न्याय मिळावा यासाठी नालासोपारा पोलिसांकडे अत्याचाराची तक्रार दाखल केली. या तक्रारीत नराधम बापाच्या मारहाण आणि शारीरिक अत्याचारामुळेच मुलीचा मृत्यू झाल्याचा आरोप तिच्या आईने केला आहे. या प्रकरणी नालासोपारा पोलिसांनी आरोपी बापावर गुन्हा दाखल केला आहे.( Mumbai Crime)
पोलिसांनी दिलेल्या अधिक माहितीनुसार, तीन महिन्यांपासून क्षयरोगाने त्रस्त असलेली पीडित तरुणी नालासोपारा पश्चिममध्ये आपल्या वडीलांसह वास्तव्यास होती. आपली मुलगी गंभीर आजाराने त्रस्त असल्याचे नराधम बापाला माहिती होती. तरीही तिच्यावर तो सातत्याने अत्याचार करत होता. तरुणीची प्रकृती ढासळत असतानाही हा प्रकार सुरूच होता.
आजाराने त्रस्त असूनही वारंवार अत्याचार
आपली मुलगी गंभीर आजाराने त्रस्त असल्याचे नराधम बापाला माहित असतानाही मुलीवर वारंवार अत्याचार करत होता. आजाराने त्रस्त असलेल्या या पीडित तरुणीला ११ नोव्हेंबरला जे जे रुग्णालयातील अतिदक्षता विभागात उपचारासाठी दाखल करण्यात आले होते. मात्र उपचारादरम्यान तिचा दुर्दैवी मृत्यू झाला.(Mumbai Rape case)