मुंबई : नायलॉन मांजा प्रकरणात निष्काळजीपणा दाखवीत असल्यामुळे फेसबुकला मुंबई हायकोर्टाच्या नागपूर खंडपीठाने मोठा दणका दिला आहे. फेसबुकवर मांजाची विक्री करणाऱ्यांवर कायदेशीर कारवाई करण्याचे निर्देश कोर्टाने सायबर पोलिसांना दिले आहेत. फेसबुकने ऑनलाईन नायलॉन मांजा विकू नये म्हणून न्यायालयाने निर्देश दिले होते.
मात्र, तरी देखील फेसबुकवरून मांजा विक्रीचा प्रकार सुरू असल्याचं समोर आलं आहे. यामुळे फेसबुकला मुंबई हायकोर्टाच्या नागपूर खंडपीठाने कायदेशीर कारवाई करण्याचे निर्देश कोर्टाने सायबर पोलिसांना दिले आहेत.