Devendra Fadnavis on Sharad Pawar: पुणे शहरात गेल्या काही दिवसांपासून एक वेगळंच राजकारण तापलेलं दिसत आहे. शहारातील मुंढवा परिसरातील अमेडिया कंपनीने खरेदी केलेल्या 40 एकर जमिनीच्या व्यवहारावरून राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार (Ajit Pawar) यांचे सुपुत्र पार्थ पवार (Parth Pawar) यांच्यावर गंभीर आरोप झाले आहेत. या घटनेनंतर राज्यभरात एकच खळबळ उडाली आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, अमेडिया कंपनीत पार्थ पवार यांची 99 टक्के मालकी, तर दिग्विजय पाटील यांची केवळ 1 टक्के मालकी असल्याचे उघडकीस आले आहे. या घटनेअंतर्गत दिग्विजय पाटील यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला असून पार्थ पवार यांच्यावर कारवाई झाली नाही. पार्थ पवार अद्याप त्यांच्यावर गुन्हा दाखल न झाल्यामुळे अनेक प्रश्न उपस्थित झाले आहे. या संपूर्ण घटनेबाबत राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे अध्यक्ष शरद पवार (Sharad Pawar) यांना विचारणा केली यावर प्रतिक्रिया देताना म्हटलं की, ‘महाराष्ट्राचे गृहमंत्री याचं उत्तर देऊ शकतील, मी देऊ शकत नाही’, या प्रतिक्रियेवर मुख्यमंत्री आणि गृहमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांनी मौन उघडले आहे.
हेही वाचा- Parth Pawar Land Scam: शीतल तेजवानी पोलिसांना चकमा देत फरार? पतीसह देशाबाहेर पळून गेल्याचा संशय…
CM देवेंद्र फडणवीस यांची स्पष्ट भूमिका
या घटनेविषयी बोलताना मुख्यमंत्री आणि गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आपली भूमिका स्पष्ट मांडली आहे. माध्यमांशी बोलताना ते म्हणाले, मी आधीच या प्रकरणाचे कारण स्पष्ट केले आहे. हा एक एफआयआर आहे. अर्थात इन्फॉर्मेशन रिपोर्ट. त्यात ज्यांच्या स्वाक्षऱ्या आहेत. त्यामुळे कंपनीचे ऑथराईज सिग्नेटरी जे होते, ज्यांनी हा सगळा व्यवहार केला, त्यांच्यावर गुन्हा दाखल झालेला आहे.
त्यासोबत सरकारमधील ज्यांनी या संदर्भात मदत केली त्यांच्यावर गुन्हा दाखल झालेला आहे. आम्ही या प्रकरणातून कुणालाही वाचवण्याचा प्रयत्न करत नाही. कोणाला वाचवण्याचे कारण नाही. जे झाले ते नियमानुसार झालेले आहे. मी यापूर्वी देखील सांगितले की, या घटनेचा तपास सुरू असताना कोणत्याही व्यक्तीचा सहभाग आढळला तर योग्य ती कारवाई करावीच लागते. कायद्यांनुसार पुढची पावले उचलली जातील.






