इम्रान आत्तार

भोर : नगरपालिका निवडणुकीच्या वातावरणामुळे सध्या राजकारण खूपच वेगवान हालचाली घडत आहेत. दोनच दिवसांपूर्वी माजी आमदार संग्राम थोपटे यांना भेटून आलेले भोरचे माजी उपनगराध्यक्ष श्री रामचंद्र आवारे यांनी आज राष्ट्रवादी अजित पवार गटांमध्ये प्रवेश केला. त्यांच्याबरोबर त्यांच्या पत्नी निर्मला आवारे ज्या मागील पाच वर्ष जनतेतून नाराध्यक्षपदी विराजमान झाल्या होत्या त्यांनी सुद्धा प्रवेश केला आहे.
या प्रवेशामुळे भोर शहराबरोबरच ग्रामीण भागातील राजकारणाला सुद्धा वेगळे वळण लागण्याची दाट शक्यता निर्माण झाली आहे. रामचंद्र आवर यांच्याबरोबरच शिक्षण मंडळाचे माजी उपसभापती गजानन शेटे, भारतीय जनता पार्टी कामगार आघाडीचे बाळा शेटे, स्वप्निल तारू, प्रथमेश गाढवे, माजी नगरसेविका उल्हाळकर, चेतन उन्हाळकर यांच्यासह अनेक कार्यकर्त्यांनी राष्ट्रवादीमध्ये प्रवेश केलेला आहे







