मुंबई : दाऊद इब्राहिम याच्या महाराष्ट्रातील 4 मालमत्तांचा आज 5 जानेवारीला लिलाव झाला. मात्र, त्यातील 2 मालमत्ता विकल्या गेलेल्या नाहीत. रत्नागिरीतील मुंबके या गावी विकल्या गेलेल्या मालमत्ता आहेत. दहशतवादी दाऊद इब्राहिमची आई अमीना बी हिच्या नावावर या 4 मालमत्ता होत्या. त्यातील 2 मालमत्तांचा आज लिलाव झाला. एका मालमत्तेसाठी 2.01 तर दुसऱ्या मालमत्तसाठी 3.28 लाखांची बोली लागली.
फोर्ब्ज मासिकाने दिलेल्या एका रिपोर्टनुसार 2015 साली दाऊदची संपत्ती जवळपास 6.7 बिलियन डॉलर आहे. शिवसेना नेते अजय श्रीवास्तव हे देखील दाऊदच्या संपत्तीच्या लिलावात सामील झाले होते. श्रीवास्तव यांनी 2001 मध्ये दाऊदच्या अनेक मालमत्तांवर बोली लावली होती. सध्या ते कायदेशीर मार्गात अडकले आहेत. मात्र, ते लवकरच दाऊदच्या घराच्या ठिकाणी शाळा सुरु करणार आहेत.
अर्थ मंत्रालयाच्या राजस्व विभागाद्वारे मुंबईतील आयकर कार्यालयात हा लिलाव पार पडला. या जमिनीला 19 लाखांची बोली लागली. लिलाव करण्यात आलेल्या स्थावर मालमत्तेमध्ये दाऊदच्या घराचाही समावेश आहे. ज्या घरातच त्याचे लहानपण गेले होते.
भारतातल्या काळ्या कारवायांचं मूळ असलेल्या दाऊदबद्दल अनेक नाना तर्कवितर्क समोर येत आहेत. काही दिवसांपूर्वी दाऊदवर विषप्रयोग झाल्याच्या बातम्या आल्या होत्या. कधी त्याच्या वास्तव्याबद्दल तर कधी त्याच्या प्रकृतीबद्दल अशा अनेकदा अफवा समोर आल्या आहेत.