Friday, July 3, 2026
  • Login
Pune Prime News
Download Android App
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
Pune Prime News
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
  • English

जितेंद्र आव्हाडांच्या अडचणीत वाढ; धार्मिक भावना दुखवल्याप्रकरणी पुण्यात पहिला गुन्हा दाखल

Laxman Dhengeby Laxman Dhenge
Friday, 5 January 2024, 17:41

पुणे : राष्ट्रवादी काँग्रेसचे शरद पवार गटाचे आमदार जितेंद्र आव्हाड यांनी केलेल्या वादग्रस्त वक्तव्याप्रकरणी त्यांच्याविरोधात पुण्यात पहिला गुन्हा दाखल करण्यात आला आहे. हिंदू धर्माच्या भावना दुखावल्या प्रकरणी आव्हाड यांच्यावर विश्रामबाग पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल केला आहे.

राष्ट्रवादी काँग्रेसच्या शरद पवार गटाचे शिर्डीत चिंतन शिबिर आयोजित करण्यात आले होते. या शिबिरामध्ये भाषण करताना जितेंद्र आव्हाड यांनी राम हे शाकाहारी नव्हते तर मांसाहारी होते, असे वक्तव्य केले होते. त्यांच्या या वक्तव्यामुळे नवा वाद निर्माण झाला असून, भाजप नेत्यांकडून जितेंद्र आव्हाड यांच्यावर सडकून टीका केली जात आहे.

दरम्यान, आव्हाड यांनी प्रभू श्रीरामांबद्दल केलेल्या वादग्रस्त विधानानंतर पुणे शहर भाजपचे शहराध्यक्ष धीरज घाटे यांनी आव्हाड यांच्याविरुद्ध तक्रार दाखल केली होती. तक्रारीनुसार, त्यांच्यावर कलम २९५ अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. आव्हाडांच्या वक्तव्याविरोधात भाजपने नुकतेच आंदोलन केले होते. त्यानंतर त्यांच्याविरोधात आज गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

 

उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या नेतृत्वाखालील राष्ट्रवादी काँग्रेसच्या कार्यकर्त्यांकडूनही आव्हाडांच्या विरोधात आंदोलन करण्यात येत आहे. आव्हाडांवर देशभरातून टीकेची झोड उठत आहे. आव्हाडांनी स्वत: आपल्या वक्तव्यावर खेद व्यक्त केला होता. त्यानंतर आता त्यांच्याविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

बीडच्या जिल्हाधिकारी कार्यालयाबाहेर राम भक्तांनी आव्हाडांच्या वक्तव्याचा निषेध करत आव्हाडांच्या प्रतिमेला जोडे मारून निषेध नोंदवला आहे. या वेळी जितेंद्र आव्हाड यांच्या विरोधात घोषणाबाजी देखील करण्यात आली.

दरम्यान, वादग्रस्त वक्तव्यामुळे आव्हाड यांच्याच पक्षाच्या नेत्यांनी त्यांना घरचा आहेर दिला आहे. शरद पवार गटाचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी शाकाहारी आणि मांसाहारी असा भेद करण्याची गरज नाही, असे म्हटले आहे. तर आमदार रोहित पवार यांनीदेखील जितेंद्र आव्हाड यांच्या विधानावरुन त्यांना ट्विटरवर खडेबोल सुनावले आहेत.

Laxman Dhenge

Laxman Dhenge

ताज्या बातम्या

फॅन्सी नंबर प्लेट, कर्कश सायलेन्सरधारकांना इंदापूर पोलिसांचा दणका; ११ हजारांचा दंड

Friday, 3 July 2026, 12:29

पुणेकरांवर पाणीकपातीचे संकट! पावसाळ्यातही धरणांनी गाठला तळ,तुमच्या भागात काय स्थिती?

Friday, 3 July 2026, 11:55

पुण्यात बिश्नोई गँगकडून व्यापाऱ्याला 5 कोटी खंडणीची धमकी, पुणे पोलिसांचा मोठा डाव अन् मुख्य आरोपी राजस्थानमधून अटक..

Friday, 3 July 2026, 11:33

केतन हत्याकांडाच रहस्य उलघडणार? सिया आणि चेतनची पोलीस कोठडी संपणार,कोर्टात हजर केल्यानंतर काय घडणार?

Friday, 3 July 2026, 10:52

घरात बाहेरचा कोणीच नाही… तरी 11.5 तोळे सोनं गायब! सख्ख्या भावावर-वहिनीवरच संशय; वाघोली येथील घटना

Friday, 3 July 2026, 10:36

घरात लग्नाची धामधूम अन् चोरट्यांचा डल्ला! उरुळी कांचन हद्दीत नववधूसाठीचे 4.20 लाखांचे सोन्याचे दागिने केले लंपास

Friday, 3 July 2026, 10:26
Next Post

दाऊदच्या 2 मालमत्तांचा लिलाव; एका मालमत्तेला 2.01 कोटींची बोली, लहानपणीचे घरही गेले

  • About us
  • Privacy Policy
  • Grievance Redressal
  • Fact-Checking Policy
  • Ownership & Funding Info

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
Don`t copy text!
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.