coronavirus : मुंबई : राज्यात कोरोना रुग्णांच्या संख्येत दररोज वाढ होतेय. आज राज्यात 37 नव्या कोरोना रुग्णांची भर पडली. सर्वाधिक रुग्ण मुंबईत आढळले आहेत. त्यानंतर ठाणे आणि पुण्यातही दररोज रुग्ण वाढत आहेत. तर, भारतात आज 116 नव्या रुग्णांची नोंद झाली आहे. तीन रुग्णांचा मृत्यू झालाय. तिन्ही रुग्ण कर्नाटकमधील आहेत. मागील 24 तासांत 293 रुग्णांनी कोरोनावर मात केली आहे. देशातील सक्रीय रुग्णांची संख्या 4170 इतकी झाली आहे.
नाताळ आणि नववर्षामुळे मोठ्या प्रमाणात पर्यटन स्थळावर गर्दी वाढली आहे. त्यामुळे पुढील काही दिवस राज्यातील कोरोना रुग्णांचे प्रमाण वाढण्याची शक्यता आहे. दिलासादायक बाब म्हणजे, राज्यात आज एकही जेएन.1 या सबव्हेरियंटचा रुग्ण आढळला नाही. राज्यात सध्या जेएन 1 व्हेरियंटचे 10 रुग्ण आढळले आहेत.
राज्यात आज 11 रुग्ण बरे होऊन घरी परतलेत. राज्यात एकूण ॲक्टिव्ह कोरोना रुग्णांची संख्या १९४ वर पोहचली आहे. सध्या राज्यातील मृत्यूदर १.८१% एवढा आहे. राज्यात आजपर्यंत एकूण 80,23,442 करोना बाधित रुग्ण बरे होऊन घरी परतले आहेत. यामुळे राज्यातील रुग्ण बरे होण्याचे प्रमाण 98.18 % एवढे झाले आहे. आज राज्यात 37 नवीन रुग्णांचे निदान झाले आहेत.