Friday, July 3, 2026
  • Login
Pune Prime News
Download Android App
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
Pune Prime News
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
  • English

साहित्य संमेलनाच्या पार्श्वभूमीवर प्रशासन ‘अलर्ट मोड’वर; जिल्हाधिकाऱ्यांनी घेतला तयारीचा आढावा

Laxman Dhengeby Laxman Dhenge
Tuesday, 26 December 2023, 20:26

अमळनेर (जि.जळगाव) : ९७ वे मराठी साहित्य संमेलन २, ३ व ४ फेब्रुवारी २०२४ रोजी अमळनेर येथील पू. साने गुरुजी साहित्य नगरी, प्रताप महाविद्यालयात होत आहे. साहित्य संमेलनाच्या तयारीचा आढावा घेण्यासाठी जळगावचे जिल्हाधिकारी आयुष प्रसाद यांनी आज अमळनेर येथे संमेलनाच्या विविध ठिकाणी जाऊन प्रत्यक्ष पाहणी केली.

यानंतर त्यांनी पीडब्लूडी, तहसील, पोलीस, एमएसईबी, नगरपालिकेसह संबंधित सर्व विभागाच्या अधिकाऱ्यांची बैठक घेत जबाबदाऱ्या निश्चित केल्या. संमेलनासाठी प्रशासनातर्फे प्रातांधिकारी महादेव खेडकर यांची समन्वय अधिकारी म्हणून नियुक्ती करण्यात आली.

संमेलनाचे स्वागताध्यक्ष तथा राज्याचे ग्रामविकास व पर्यटनमंत्री गिरीश महाजन यांनी रविवारी संमेलनाचा आढावा घेतला होता. त्यानंतर त्यांनी जिल्हाधिकाऱ्यांना फोन करुन काही सूचना दिल्या होत्या. त्या अनुषंगाने जिल्हाधिकारी आयुष प्रसाद यांनी आज प्रताप महाविद्यालयास भेट दिली. यावेळी त्यांनी अमळेनर येथील सर्व विभागाच्या अधिकाऱ्यांना उपस्थित राहण्याच्या सूचना दिल्या होत्या. सर्व अधिकाऱ्यांसोबत जिल्हाधिकाऱ्यांनी संमेलनाच्या सर्व कार्यक्रमस्थळांना भेटी देत पाहणी केली.

 

त्यानंतर प्रताप महाविद्यालय, अमळनेर येथे झालेल्या बैठकीत कोणत्या विभागाने कोणती कामे करावी, हे निश्चित करुन जबाबदाऱ्यांचे वाटप करण्यात आले. यावेळी प्रातांधिकारी महादेव खेडकर यांची समन्वय अधिकारी म्हणून नियुक्ती करण्यात आली. तयारीचा सर्व आढावा घेऊन चार दिवसात अहवाल देण्याच्या सूचना अधिकाऱ्यांना दिल्या. साहित्य संमेलन यशस्वी होण्यासाठी प्रशासन सर्वोतोपरी सहकार्य करेल, असे आश्वासन म. वा. मंडळाचे अध्यक्ष डॉ. अविनाश जोशी यांना दिले.

या बैठकीला संमेलनाचे महाव्यवस्थापक बजरंग अग्रवाल, मराठी वाङ्‌मय मंडळाचे उपाध्यक्ष श्यामकांत भदाणे, रमेश पवार, कार्यवाह नरेंद्र निकुंभ, शरद सोनवणे, कोषाध्यक्ष प्रदीप साळवी, कार्यकारी सदस्य प्रा. डॉ. पी बी भराटे, बन्सीलाल भागवत यांच्यासह खान्देश शिक्षण मंडळाचे अध्यक्ष जितेंद्र झाबक, उपाध्यक्ष जितेंद्र देशमुख, माधुरी पाटील, कार्याध्यक्ष डॉ. अनिल शिंदे, कार्यउपाध्यक्ष प्रदिप अग्रवाल, सदस्य हरी वाणी, विनोद मधुकर पाटील तसेच प्रांताधिकारी महादेव खेडकर, अमळनेर नगरपालिकेचे मुख्याधिकारी प्रशांत सरोदे, गायकवाड यांच्यासह अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते.

 

Laxman Dhenge

Laxman Dhenge

ताज्या बातम्या

‘शिंदे साहेब तुमची आठवण काढत आहेत म्हणत…’ वसंत मोरेंना मोठे पद, कार्यालयाची ऑफर; राजकीय वर्तुळात खळबळ

Friday, 3 July 2026, 9:15

Gold Price Today: सोने महाग, चांदीही तेजीत! बाजारात दरवाढीचा सिलसिला कायम

Friday, 3 July 2026, 9:05

इराणच्या दोन वरिष्ठ नेत्यांना संपवण्याचा कट? इस्रायलने सज्ज केली होती 2 फायटर जेट्स; अमेरिकेच्या हस्तक्षेपाने टळला हल्ला

Friday, 3 July 2026, 8:48

प्रेम, कट आणि हत्या! केतन अग्रवाल प्रकरणात रोज नवे धक्कादायक खुलासे; पोलिसांनी घेतला ‘हा’ निर्णय

Friday, 3 July 2026, 8:17

Rain Alert Maharashtra: पुढील 72 तास धोक्याचे! मुंबई, पुण्यासह राज्यातील अनेक जिल्ह्यांना मुसळधार पावसाचा इशारा

Friday, 3 July 2026, 7:47

Horoscope Today: आज ग्रहांची साथ कोणाला? 12 राशींसाठी जाणून घ्या दिवसाचे संपूर्ण भविष्य

Friday, 3 July 2026, 7:38
Next Post

Sanitary Pads : मासिक पाळीत पॅडमुळे अ‍ॅलर्जी होते? हे छोटे उपाय करून पहा, नक्की फायदेशीर ठरतील

  • About us
  • Privacy Policy
  • Grievance Redressal
  • Fact-Checking Policy
  • Ownership & Funding Info

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
Don`t copy text!
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.