मुंबई : आज पाच राज्यांपैकी चार राज्यांचे निकाल जाहीर होत असताना दुसरीकडे राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे स्वच्छ मुंबई मोहिमेत व्यस्त असल्याचा दिसत आहे. स्वच्छ, सुंदर आणि हरित मुंबईसाठी बृहन्मुंबई महानगरपालिकेने प्रत्येक परिमंडळातील एका प्रशासकीय विभागात व्यापक स्तरावर संपूर्ण स्वच्छता मोहीम राबविण्याचे नियोजन केले आहे.
मुख्यमंत्र्यांनी सकाळी सकाळी मुंबईतील धारावी येथे जाऊन या मोहिमेचा शुभारंभ केला. यावेळी स्वच्छता कर्मचाऱ्यांसोबत चक्क मुख्यमंत्र्यांनी स्वत: रस्त्यावर उतरून तसेच पाणी मारुन रस्ते स्वच्छ धुतले. मुंबई महापालिकेचे स्वच्छता कर्मचारी स्वच्छता करत होते, त्यावेळी मुख्यमंत्र्यांनी स्वत: पाईप हातात घेऊन, रस्त्यांवर पाणी मारलं. (CM Eknath Shinde)
दरम्यान, मुख्यमंत्र्यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आधी शीव येथील बृहन्मुंबई महानगरपालिकेचे लोकमान्य टिळक सर्वसाधारण रुग्णालय येथील प्रवेशद्वार क्रमांक ७ जवळ असलेल्या डॉ. बाबासाहेब आंबेडकर पुतळा परिसरातून या मोहिमेला सुरुवात केली. यावेळी मुख्यमंत्र्यांनी सायन रूग्णालयात फिरून वैद्यकीय सेवेच्या सज्जतेची पाहणी केली. यावेळी मुंबईचे पालकमंत्री दीपक केसरकर उपस्थित होते. (CM Eknath Shinde visits Sion Hospital)
यावेळी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे म्हणाले, सायन रुग्णालयच्या आयसीयू आणि जनरल वॉर्डमध्ये 200 ICU आणि एक हजार बेड वाढवण्याच्या सूचना दिल्या आहेत. तीन हजारापेक्षा जास्त बेड वाढवले जातील. सहा महिन्याच्या आत हे काम पूर्ण होईल. सोनोग्राफी मशीन, डायलिसिस युनिट वाढवण्याबाबत सूचना दिल्या आहेत. असं मुख्यमंत्री म्हणाले. (CM Eknath SHinde)
पुढे बोलताना म्हणाले, दुसरा विषय मुंबईची स्वच्छता. आज डीप क्लीन ड्राईव्ह या ठिकाणी स्वच्छता मोहीम सुरू झालेलं आहे. आता इथून त्याची सुरुवात झाली आहे. धारावीमध्ये 24 विभाग असून या विभागांमध्ये दर शनिवार आणि रविवार किंबहुना आठवड्यातून एकदा स्वच्छता मोहीम राबवण्याचा प्रयत्न असेल. या रस्त्यावर दोनशे लोक काम करतात, तेवढ्यावर अवलंबून न राहता आजूबाजूचे चार पाच वॉर्ड एकत्र करून रस्ते स्वच्छ करणे त्याच्यावरची माती काढणं, गटर सफाई करणे, हे काम सुरु आहे, असं मुख्यमंत्री एकनाथ शिंदे म्हणाले. (CM Eknath SHinde)