मुंबई : ‘सेबी’कडून गुंतवणुकीसंदर्भात अनेक नियम लावले जातात. त्या नियमांचे पालन न केल्यास कारवाई केली जाते. त्यात आता ‘बॉम्बे स्टॉक एक्सचेंज’ (BSE) आणि ‘नॅशनल स्टॉक एक्सचेंज’ने (NSE) डझनहून अधिक भारतीय कंपन्यांना दंड ठोठावला आहे. या कंपन्यांच्या संचालक मंडळाच्या रचनेशी संबंधित सेबीच्या नियमांचे पालन न केल्याबद्दल हा दंड ठोठावण्यात आला आहे.
‘बीएसई’ आणि ‘एनएसई’कडून आकारला जाणारा दंड 34,000 ते 5.5 लाख रुपयांपर्यंत आहे. कंपन्यांच्या एक्सचेंज फाइलिंगवरून असे दिसून येते की महिला संचालकांसह आवश्यक संख्येने स्वतंत्र संचालकांची नियुक्ती करण्यात अयशस्वी झाल्यामुळे दंड ठोठावण्यात आला आहे. या 12 पेक्षा जास्त कंपन्यांपैकी बहुतेक सरकारी कंपन्या आहेत.
याबाबत अदानी ग्रीन एनर्जी सांगितले की, ‘7 सप्टेंबर 2023 पासून आणखी दोन स्वतंत्र संचालकांची नियुक्ती केली आहे. त्यानंतर, समित्यांच्या रचनेत बदल करण्यात आले आहेत. त्यानंतर कंपनी सेबीच्या नियमांचे पूर्णपणे पालन करत आहे. हिंदुस्तान कंपोझिटला बिगर कार्यकारी संचालकाची नियुक्ती करण्यास विलंब केल्याबद्दल 1,62,000 रुपयांचा दंड ठोठावण्यात आला आहे’.
कोणत्या कंपनीला किती दंड ?
अदानी ग्रीन एनर्जी – ५,६१,६८०
हिंदुस्थान झिंक – ५,४२,८००
इरकॉन – ५,४२,८००
HPCL – ५,४२,८००
इंडियन ऑइल – ५,४२,८००
गार्डन रीच शिपबिल्डर्स – ५,४२,८००.