Monday, September 7, 2026
  • Login
Pune Prime News
Download Android App
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
Pune Prime News
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
  • English

Bollywood News : दिशा पटानीच्या घरावर झालेल्या गोळीबारचे कारण आले समोर, ‘या’ गँगने स्वीकारली हल्ल्याची जबाबदारी

Renuka Pawarby Renuka Pawar
Saturday, 13 September 2025, 9:10

Bollywood News : बॉलिवूड (Bollywood News) कलाकारांच्या घरांवर गोळीबार आणि धमक्यांचे प्रकार आता नवीन राहिलेले नाहीत. यापूर्वी सलमान खान, कपिल शर्मा यांना धमक्या तसेच त्यांच्या काही ठिकाणांवर गोळीबार देखील करण्यात आला आहे. आता बॉलिवूड अभिनेत्री दिशा पटानीच्या (Disha Patani) बरेलीतील घरावर गोळीबाराची घटना घडली आहे. या हल्ल्याचा सीसीटीव्ही फुटेज समोर आला असून, हल्ल्यामागील कारण आणि हल्लेखोरांची माहिती देखील समोर आली आहे.

काल (12 सप्टेंबर 2025) रात्री बरेली येथील दिशा पटानीच्या घराबाहेर गोळीबार झाला. यावेळी दिशाचे आई-वडील आणि मोठी बहीण खुशबू पटानी घरात होते. घराबाहेर दोन गोळ्या झाडण्यात आल्या, परंतु सुदैवाने या घटनेत कोणालाही इजा झालेली नाही.

या घटनेबाबत पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, दोन हल्लेखोर दुचाकीवरून दिल्ली-लखनौ महामार्गावरील मार्गाने आले आणि गोळीबार शहराबाहेर पळून गेले. पोलीस सध्या दिशाच्या घरापासून ते महामार्गापर्यंतच्या सीसीटीव्ही फुटेजची तपासणी करत आहेत. तपासात असेही समोर आले आहे की, हल्लेखोरांनी गोळीबारापूर्वी दिशाच्या घराची रेकी केली होती. पोलिसांना 7 गोळ्या झाडल्याचा संशय आहे, परंतु 2-3 गोळ्यांचे पुरावे सापडले आहेत.

बरेलीचे वरिष्ठ पोलीस अधीक्षक (एसएसपी) अनुराग आर्य यांनी या घटनेची गंभीर दखल घेतली असून, त्यांनी सोशल मीडिया प्लॅटफॉर्म X वर एक व्हिडीओ शेअर करत या प्रकरणाचा तपास सुरू असल्याचे सांगितले आहे. पोलिसांनी विशेष पथके स्थापन करून हल्लेखोरांचा शोध सुरू केला आहे.

 

प्राथमिक माहितीनुसार, या गोळीबारामागे दिशाची बहीण खुशबू पटानीने जुलै 2025 मध्ये इन्स्टाग्राम स्टोरीवर केलेल्या वादग्रस्त टिप्पणीचा संबंध असल्याचे समोर आले आहे. खुशबूने कथावाचक अनिरुद्धाचार्य यांच्याबद्दल टिप्पणी केली होती, जी प्रेमानंद जी महाराज यांच्याशी जोडली गेली आणि यामुळे मोठा वाद निर्माण झाला. खुशबूने नंतर व्हिडीओद्वारे स्पष्टीकरण दिले की तिची टिप्पणी अनिरुद्धाचार्य यांच्याबद्दल होती. या वादानंतर तिला लक्ष्य करण्यात आले.

हल्ल्यानंतर वीरेंद्र चरण आणि महेंद्र सरन या हल्लेखोरांनी सोशल मीडियावर धमकीचे निवेदन जारी केले. तसेच, अमेरिकेत असलेल्या कुख्यात गुंड रोहित गोदारा आणि गोल्डी बरार गँगने व्हॉइस मेसेजद्वारे या गोळीबाराची जबाबदारी स्वीकारली आहे. त्यांनी दावा केला की, हा हल्ला खुशबूच्या वादग्रस्त टिप्पणीमुळे आणि हिंदू संतांचा कथित अपमान केल्यामुळे करण्यात आला.

पोलीस या प्रकरणात सोशल मीडियावरील धमकीच्या पोस्टची सत्यता तपासत आहेत. विशेष ऑपरेशन ग्रुप (SOG) सह पाच पथके हल्लेखोरांचा शोध घेण्यासाठी कार्यरत आहेत. ही घटना बॉलिवूड कलाकारांवरील वाढत्या धमक्यांच्या मालिकेतील एक आहे, ज्यामुळे सुरक्षा व्यवस्थेबाबत प्रश्न उपस्थित होत आहेत.

Renuka Pawar

Renuka Pawar

ताज्या बातम्या

पुण्यात खळबळ! “चंद्या खाली ये, आज तुला मारुन टाकतो” म्हणत तरुणावर थेट गावठी पिस्तुलातून गोळीबार

Sunday, 6 September 2026, 23:02

वाघोली–केसनंद वाहतूक कृती समितीची बैठक संपन्न! वाहतूक कोंडी फोडण्यासाठी विविध उपाययोजनांची मागणी; कारवाई न झाल्यास आंदोलनाचा इशारा

Sunday, 6 September 2026, 21:57

शिरूरमध्ये मध्यरात्री थरार! गाडीला बस घासल्याचा बनाव करत बसच्या चालक-वाहकाला मारहाण; तिकिटाचे पैसे लुटले, चावी हिसकावत दगडफेक करत लुटारू पसार

Sunday, 6 September 2026, 21:07

छत्रपती संभाजीनगरमध्ये स्पा-सलून सेंटरवर कारवाई न करण्यासाठी ८० हजारांची लाच घेणारा हेड कॉन्स्टेबल एसीबीच्या जाळ्यात

Sunday, 6 September 2026, 20:37

आयोगातील असो किंवा बाहेरचा, कुणाचीही कसलीही खैर नाही! परीक्षा घोटाळ्यावर मुख्यमंत्र्यांची कडक भूमिका

Sunday, 6 September 2026, 19:58

‘आई, तू तुझी काळजी घे’ आईला शेवटचं बोलली अन् नंतर उचललं टोकाचं पाऊल; पतीची ‘ती’ एक मागणी अन् संसार उध्वस्त…

Sunday, 6 September 2026, 19:15
Next Post

Saarthi Scholarship : 70 हजार विद्यार्थ्यांचे स्वप्न धूसर, राज्यात सारथीची शिष्यवृत्ती अचानक बंद

  • About us
  • Privacy Policy
  • Grievance Redressal
  • Fact-Checking Policy
  • Ownership & Funding Info

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
Don`t copy text!
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.

news-on-whatsapp