मुंबई: विधान परिषदेच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर भारतीय जनता पक्षाच्या सर्व आमदारांचा मुक्काम ताज प्रेसिडेंट हॉटेलमध्ये असणार आहे. विधान परिषदेच्या निवडणुकीत दगाफटका होऊ नये, म्हणून खबरदारी घेण्यात आली आहे, अशी सूत्रांची माहिती आहे. 11 जागांसाठी 12 जुलै रोजी मतदान पार पडणार आहे.
11 जुलैला काँग्रेसच्या सर्व आमदारांची बैठक
11 जुलैला काँग्रेसचे प्रभारी रमेश चैन्नीथला मुंबईत येत असून त्यादिवशी ते सर्व आमदारांची बैठक घेणार आहेत. या बैठकीत विधानपरिषद निवडणुकीच्या संदर्भात महत्वाच्या सूचना करणार आहेत. 11 जागांसाठी 12 अर्ज आल्याने सध्याच्या विधानपरिषद निवडणुकीत अटीतटीची लढत होणार आहेत. परंतु, हॉटेलमध्ये आमदारांना ठेवण्यासंदर्भात अजून काँग्रेसकडून निर्णय घेण्यात आलेला नाही.