Bigg Boss 17 : मुंबई : ‘बिग बॉस 17’ शोमध्ये अंकिता लोखंडे पती विकी जैनसोबत सहभागी झाली आहे. कपल सध्या त्यांच्या वैयक्तिक आयुष्यामुळे चर्चेत आहेत. त्यांच्यातले वाद काही केल्या संपत नाहीयेत.आता तर गोष्टी त्याहून पुढे गेल्याच पहायला मिळत आहेत. आता या कार्यक्रमात विकी थेट अंकितावर हात उचलताना दिसला.
नुकत्याच पार पडलेल्या एपिसोडमध्ये अंकिता लोखंडे, विकी जैन, अभिषेक कुमार आणि अरुण माशेट्टी यांच्यात जोरदार वाद झालेला पाहायला मिळाला. अभिषेक कुमार विकीसोबत एका विषयावर वाद घालताना दिसून येतात. दरम्यान त्यांच्या भांडणात अंकिताची एन्ट्री होते. त्यानंतर विकी जैन तिला शांत राहायला सांगतो. ती एकत नसल्याच पाहून अंकिता लोखंडेवर हात उचलतो.
This is Very Wrong ,Stay strong #AnkitaLokhande .You deserves better, you strong fierce personality many girls are follow you because of your personality, please stop taking this shit. If Vickey is doing this in front of camera then what he does when there no camera.#BigBoss17 pic.twitter.com/gBkFb4swwM
— ???????????????? ???????????????????? ???????????????????????????????? ???????? ™ (@IamTinaDattaOFC) December 22, 2023
विकी जैन अंकितावर धावून जातानाचा व्हिडीओ सध्या जोरदार व्हायरल होत आहे. नेटकरी विकी जैनला ट्रोल करत आहेत. विकी जैन अंकिता लोखंडेवर धावून गेला हे प्रचंड वाईट आहे. विकी जैन त्याच्या पत्नीची किंमत करत नाही. नॅशनल टीव्हीवर पत्नीसोबत असं वागत असेल तर घरी कसा वागत असेल, अशा कमेंट्स चाहत्यांनी केल्या आहेत.
“विकीचं माझ्यावर प्रेम आहे हे मला माहिती आहे. पण मला काय हवं या गोष्टीचा विकी कधी विचार करत नाही. बिग बॉसच्या घरात मी कधी कोणत्या पुरुष स्पर्धकासोबत भांडते तेव्हा विकी मला थांबवण्याचा प्रयत्न करतो”. असे ती ऐका स्पर्धला बोलत होती. डिसेंबर 2021 मध्ये अंकिता लोखंडे आणि उद्योगपती विकी जैनचा विवाहसोहळा पार पडला होता.