मुंबई : शिक्षण क्षेत्राशी संबंधित मोठी बातमी समोर आली आहे. राज्यातील राज्य शिक्षण मंडळांच्या शाळांना सीबीएसई अभ्यासक्रम लागू करण्यासंदर्भात सूचना देण्यात आल्या आहेत. शैक्षणिक वर्ष 2025-2026 पासून राज्य शासनाच्या शाळांमध्ये सीबीएससी पॅटर्न लागू होणार आहे. राज्याचे शिक्षणमंत्री दादा भुसे यांनी यासंदर्भात आज सभागृहात माहिती देत घोषणा केली आहे.

अधिक माहिती अशी की, राज्यातील विद्यार्थ्यांची गुणवत्ता वाढीस लागावी हा उद्देश समोर ठेऊन सरकारने सीबीएससी पॅटर्न लागू करण्याचा निर्णय घेतला आहे. विशेष म्हणजे यंदाच्या शैक्षणिक वर्षापासूनच स्टेट बोर्ड शाळेतील विद्यार्थ्यांच्या अभ्यासक्रमात सीबीएससी पॅटर्न लागू करण्यात येणार आहे. राज्य अभ्यासक्रम आराखड्याला शालेय शिक्षण विभागाशी संदर्भात सुकाणू समितीने मान्यता दिली आहे.
शिक्षण मंत्री दादा भुसे यांनी विधान परीषदेतील आमदार प्रसाद लाड यांनी विचारलेल्या प्रश्नाला लेखी उत्तर देताना ही माहिती दिली. सीबीएसई अंतर्गत पाठ्यपुस्तके मराठीत उपलब्ध करुन दिली जाणार असून 1 एप्रिलपासून सत्राची सुरुवात करण्यात येणार असल्याचे उत्तर दादा भुसे यांनी दिले.








