पुणे : रिटायरमेंटनंतरही नोकरी शोधत असाल तर ही बातमी खास तुमच्यासाठी. निवृत्त झालेल्या कर्मचाऱ्यांसाठी सेंट्रल पल्प अँड पेपर रिसर्च इन्स्टिट्यूटमध्ये भरती सुरु आहे.या सरकारी संस्थेत सल्लागार पदासाठी ही भरती जाहीर करण्यात आली आहे. या नोकरीसाठी तुम्ही CPPRE च्या अधिकृत वेबसाइटवरुन अर्ज करु शकतात. त्यासाठी cppri.res.in या वेबसाइटवर सर्व माहिती देण्यात आली आहे.
सल्लागार पदासाठी सरकारी/पीएसयू/ विद्यापीठ/ संशोधन संस्था / स्वायत्त संस्थेतून निवृत्त झालेले उमेदवार अर्ज करु शकतात. या नोकरीसाठी अर्ज करणाऱ्या उमेदवाराकडे सचिव किंवा समकक्ष पदावर तीन वर्षांचा अनुभव असायला हवा. सल्लागार ग्रेड I पदासाठी स्टेनोग्राफर किंवा सेक्शन ऑफिसर या पदावर ५ वर्षांचा कामाचा अनुभव असायला हवा.
या नोकरीसाठी उमेदवारांची निवड वॉक इन इंटरव्ह्यूद्वारे केली जाणार आहे. इंटरव्ह्यू २४ मार्च रोजी होणार आहे. यासाठी सकाळी ९ वाजता सेंट्रल पल्प अँड पेपर रिसर्च इन्स्टिट्यूट, सहारनपूर, उत्तर प्रदेश २४७००१ येथे उपस्थित राहायचे आहे. ही भरती कंत्राटी पद्धतीने होणार आहे.सेंट्रल पल्प अँड पेपर रिसर्च इन्स्टिट्यूट उत्तर प्रदेश, सहारणपूर येथे ही भरती केली जाणार आहे. सल्लागाण श्रेणी १ आणि २ अशा दोन पदांसाठी ही भरती केली जाणार आहे. त्यामुळे निवृत्तीनंतरही सरकारी नोकरी करण्याची संधी उपलब्ध करून देण्यात आली आहे.