ठाणे : भिवंडी शहरात नकली बंदुकीने दहशत पसरवणाऱ्या दोघांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. ठाणगेआळी परिसरात दोघा तरुणांमध्ये एका जुन्या वादातून हाणामारी झाली. या घटनेनंतर हवेत गोळीबार करण्यात आला. या घटनेमुळे परिसरातले नागरिक घाबरले आहेत.
घटनेची माहिती मिळताच निजामपूर पोलिसांनी दोन्ही गटाच्या तरुणांवर अदखल पात्र गुन्हा दाखल करत बंदूक जप्त केली. त्यानंतर पोलिसांच्या लक्षात आले की ही बंदूक खरी नसून खोटी बंदूक (एअरगन) आहे. तुषार खाडेकर आणि मिखंज पटेल या दोघांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
जुन्या वादातून हाणामारी
तुषार खाडेकर आणि नारायण भोइर यांच्यात जुना वाद होता. नारायण भोईर यांचा पुतण्या उमेश भोईर आणि कृष्णा चव्हाण हे दोघे एकमेकांचे मित्र आहेत. भिवंडी शहरातील ठाणगेआळी परिसरात कृष्णा चव्हाण याने तुषार खाडेकर याने नारायण काका बरोबर तू का उगाच भांडण करतो? असा प्रश्न विचारला. यावरून कृष्णा आणि तुषार खाडेकर यांच्यात बाचाबाची होऊन भांडण सुरू झाली. कृष्णा यांने मिखंज पटेल यास आपल्या मदतीसाठी बोलावले. त्यानंतर तुषार खाडेकर आणि मिखंज पटेल यांच्यात जोरदार हाणामारी झाली. मात्र यावेळी मिखंज पटेलच्या कमरेला बंदूक होती आणि त्याने बंदूक काढून हवेत फायरिंग केल्याची माहिती समोर आली आहे.