Ethanol Ban : राज्यातील ऊस उत्पादक शेतकरी आणि कारखानदार यांना दिलासा देणारी बातमी आहे. साखर कारखान्यांना B मोलैसीस, उसाचा रस आणि सिरप पासून इथेनॉल निर्मितीवर १५ डिसेंबर २०२३ रोजी बंदी घालण्यात आली होती. इथेनॉल निर्मितीवर घातलेली बंदी उठवण्यात आली आहे. त्यामुळे ऊस उत्पादक शेतकऱ्यांना मोठा दिलासा मिळाला आहे. दरम्यान, राष्ट्रीय सहकारी साखर महासंघाने वारंवार बंदी उठवण्याची मागणी केली होती. या मागणीला मोठं यश आलं आहे.