Badlapur Crime News: तीन मुलांच्या आईने असं काही केलं ज्यामुळे शहरात एकच खळबळ उडाली आहे. विवाहीत महिलेने प्रियकरासाठी आपल्या पतीचा आयुष्यभरातूनच काटा काढला. बदलापूर येथे राहणाऱ्या विवाहित महिलेने आपल्या पतीचा गळा आवळून खून केल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. पती आणि पत्नीच्या सततच्या वादाला कंटाळून महिलेने आपल्या प्रियकरासोबत हा गुन्हा केल्याची माहिती समोर येत आहे.
सुत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार, बदलापूर येथील विवाहीत महिलेने आपल्या पतीचा खून करून प्रियकरासोबत पळ काढला. आरोपी महिला बदलापूर येथील पश्चिम भागात आपल्या पती आणि तीन मुलासंह राहत होती. आरोपीचा पती व्यापारी असल्याने व्यवसायानिमित्त बाहेर गावी जात असे. याच दरम्यान पत्नीचे त्यात भागात राहणाऱ्या एका विवाहित पुरुषाशी प्रेमसंबध जुळले. काही दिवसांपूर्वी ही बाब पतीच्या लक्षात येताच दोघांमध्ये वाद सुरु व्हायला लागले. सततच्या वादाला कंटाळून पत्नीने आपल्या पतीला मारून टाकायचे ठरवले.
त्या रात्री नेमकं काय घडलं
हमी प्रमाणे शुक्रवारी तो आपली कामे आवरून बेडरूमध्ये झोपायला गेला. गाढ झोपेत असताना पत्नीने प्रियकराला घरी बोलावून घेतले. दोघांनी मिळून पतीला ठार मारण्याचे नियोजन केले. नंतर दोरीच्या साहाय्याने पतीचा गळा आवळला. याच दरम्यान त्याचा मृत्यू झाला. त्यानंतर मृतदेहाचा ठावठिकाण लावण्यासाठी दोघांन्ही तो मृतदेह गादीत गुंडाळला आणि बाईकवरून जाऊन उल्हास नदीच्या पात्रात फेकला.
दुसऱ्या दिवशी नदीच्या किनाऱ्यावर एक मृतदेह आढळून आला. या घटनेची माहिती पोलिसांना देण्यात आली. पोलिसांनी मृतदेह ताब्यात घेतला. या घटनेविषयी पोलिसांना संशय आला आणि चौकशी सुरु करताच आरोपी पत्नीला ताब्यात घेतले. पत्नीने चौकशीत आपला गुन्हा कबुल केला. या गुन्ह्यात आपला प्रियकर सहभागी असल्याचे देखील सांगितले.
पोलिसांनी दोघांवर खूनाचा गुन्हा नोंदवला असून दोघांना ताब्यात घेतले आहे. या प्रकरणी पुढील तपास करण्यात आली आहे.






