Wednesday, April 1, 2026
  • Login
Pune Prime News
Download Android App
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
Pune Prime News
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
  • English

पुण्याच्या वारजे भागातील ‘दृश्यम स्टाईल’ हत्याकांडाचा CCTV समोर…; ‘त्या’ दिवशी ‘काय’ घाडलं? वाचा सविस्तर…

ASHLESHA MASKEby ASHLESHA MASKE
Sunday, 9 November 2025, 18:10
Pune Crime: 'Visible' style murder in Pune! Suspected of wife's affair; took her for a walk on the pretext of eating bhel and committed a horrific act

Photo-Social Media

पुणे: पुण्यातील वारजे परिसरात ‘दृश्यम’ शैलीतील थरारक (Pune Crime) हत्याकांड उघडकीस आले आहे. येथील एका (Pune News) व्यवसायिकाने पत्नीच्या विवाहबाह्य संबंधांच्या संशयावरून तिची निर्घृण हत्या केली आहे. पत्नीचा खून केल्यानंतर पुरावे नष्ट करून ती हरवल्याची तक्रार पोलिसांत दाखल करण्यात आली होती. मात्र पोलिस तपासात या गुन्ह्याचा पर्दाफाश झाला असून या प्रकरणाचा पहिला सीसीटीव्ही फुटेजही समोर आला आहे.

 

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आरोपी पतीने पत्नीच्या कथित प्रेमसंबंधांच्या संशयावरून तिचा गळा आवळून खून केला आणि मृतदेह नदीत फेकून दिला. या जोडप्याचा भेळ खाण्यासाठी गेलेल्या ठिकाणाचा सीसीटीव्ही फुटेज आता समोर आला आहे. या व्हिडिओमध्ये आरोपी पती पत्नीला घेऊन जात असल्याचे स्पष्ट दिसते. तपासात समोर आले की, भेळ खात असतानाच आरोपीने पत्नीचा गळा दाबून तिचा खून केला होता.

हत्या केल्यानंतर आरोपीने पुरावे नष्ट करण्यासाठी विविध युक्त्या आखल्या आणि नंतर पोलिसांकडे पत्नी हरवल्याची खोटी तक्रार दिली. वारजे पोलिसांनी तपास सुरू केल्यानंतर संपूर्ण प्रकरणाचा उलगडा झाला. आरोपीचे नाव समीर पंजाबराव जाधव असे असून, हत्या झालेल्या पत्नीचे नाव अंजली समीर जाधव (वय 38) असे आहे.

तपासात असे निष्पन्न झाले की, अंजलीचे एका व्यक्तीशी प्रेमसंबंध असल्याचा संशय समीरला आला होता. तिच्या मोबाईलवरील चॅट्स पाहिल्यानंतर त्यांच्या दरम्यान अनेकदा वाद झाले. पत्नी सुधारत नसल्याचे पाहून समीरने तिचा खून करण्याचा निर्णय घेतला. त्यासाठी त्याने शिंदेवाडी येथे 18 हजार रुपये भाड्याने एक गोदाम घेतले. त्या ठिकाणी लोखंडी बॉक्स तयार करून ठेवला आणि लाकडाची पोती आणून खून करण्याची संपूर्ण तयारी केली.

26 ऑक्टोबर रोजी समीरने अंजलीला कारने फिरायला नेले. नवले ब्रिजमार्गे खेडशिवापूर आणि मरीआई घाट परिसरात फिरवल्यानंतर परतीच्या प्रवासात शिंदेवाडी येथे थांबून भेळ खाण्याचा बहाणा केला. दोघे गोदामात चटईवर बसून भेळ खात असताना त्याने अचानक अंजलीचा गळा दाबून तिचा खून केला. त्यानंतर पत्नीचा मृतदेह लोखंडी बॉक्समध्ये ठेवून पेट्रोल ओतून जाळला, राख नदीपात्रात टाकली आणि बॉक्स भंगारात विकून टाकला.

या प्रकाराने परिसरात खळबळ उडाली असून वारजे पोलिसांनी या हत्याकांडाचा तपास अधिक गतीने सुरू केला आहे. या प्रकरणात सीसीटीव्ही फुटेज, मोबाईल चॅट्स आणि इतर पुरावे पोलिसांच्या हाती लागले असून आरोपीला अटक करण्यात आली आहे.

 

ASHLESHA MASKE

ASHLESHA MASKE

ताज्या बातम्या

पुण्यातील थरार घटना! बाचाबाची झाली अन थेट 3 पाळीव कुत्रेच अंगावर सोडले; तरुण रक्ताच्या थारोळ्यात

Wednesday, 1 April 2026, 10:33

पुण्यात महिला पत्रकाराशी गैरवर्तन; संतोष पंडितविरोधात गुन्हा दाखल

Wednesday, 1 April 2026, 9:59

15 वर्षांची प्रतीक्षा संपली! आजपासून देशात ‘महाजनगणने’चा श्रीगणेशा; तुमच्या दारात येऊन अधिकारी विचारणार ‘हे’ प्रश्न

Wednesday, 1 April 2026, 9:53

भक्तांना लुटलं, पुण्यात फ्लॅट घेतला! अशोक खरातने भोंदूगिरीकरून उभारली शेकडो कोटींची संपत्ती; बिल्डरला दिले ‘रोख’ पैसे

Wednesday, 1 April 2026, 9:37

शेतकरी मित्रांनो लक्ष द्या! अनुदानाच्या नियमात मोठा बदल; 1 एप्रिलपासून ‘या’ कामाशिवाय खात्यात येणार नाहीत पैसे

Wednesday, 1 April 2026, 9:13

शस्त्रपरवाना वादात अमिताभ गुप्ता आणि जालिंदर सुपेकर निर्दोष; दोन वर्षांच्या चौकशीनंतर मिळाला मोठा दिलासा

Wednesday, 1 April 2026, 9:06
Next Post
A letter was written directly to the MLA for marriage, the young man's act went viral on social media

Viral: लग्नासाठी थेट आमदाराला लिहलं पत्र, तरुणाचा कारनामा सोशल मीडियावर व्हायरल

  • About us
  • Privacy Policy
  • Grievance Redressal
  • Fact-Checking Policy
  • Ownership & Funding Info

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
Don`t copy text!
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.