Jaipur: अवघ्या 43 वर्षी ही अविवाहीत असलेल्या तरुणाने थेट आमदाराला पत्र लिहलं आहे. या पत्रात असं काही लिहलं आहे ज्यामुळे हे पत्र सद्या सोशल मीडियावर चर्चेत आलं आहे. लग्न ठरत नसल्यामुळे तरुणाने भाजप पक्षाच्या आमदाराला पत्र लिहिलं आहे. तरुणाने पत्रात आमदाराला लग्न करण्यास मदत करा अशी विनंती केली आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, कैलास शर्मा वय वर्ष 43 असं या तरुणाचे नाव आहे. त्याचं लग्न न झाल्यामुळे त्यानं थेट भाजप पक्षातील माजी आमदार रामलाल शर्मा यांना पत्र लिहलं आहे. कैलास शर्मा हा जयपूर येथील चौमू शहारातील चितवाडी येथील रहिवासी आहे. त्यांनी पत्रात म्हटलं की, सर, मी गेल्या 2- 3 दिवसांपूर्वी सोशल मीडियावर तुमचे एक विधान ऐकले होते. ज्यात तूम्ही 40 वर्षापेक्षा जास्त वयाच्या अविवाहित तरुणांसाठी लग्न लावण्याबद्दल बोलत होते.
हेही वाचा- कदमवाकवस्ती येथील दत्त मंदीराजवळ कार व दुचाकीचा अपघात ; दुचाकीचालकावर गुन्हा दाखल
पुढे त्याने असे लिहले आहे की, मी ४३ वर्षाचा आहे, अजूनही माझे लग्न झाले नाही. कृपया माझे लग्न लावून देण्यास मदत करा, अशी विनंती त्या तरुणाने पत्रामध्ये केली आहे. सोशल मीडियावर कैलास शर्माचे हे पत्र व्हायरल होत आहे. व्हायरल झालेल्या या पत्रावर अनेक नेटकऱ्यांना प्रतिक्रिया दिल्या आहेत.
या पत्रावर माजी आमदार रामलाल शर्मा यांच्याकडून औपचारिक प्रतिसाद मिळालेला नाही. या घटनेनंतर शहरात एकच चर्चा सुरु आहे.





