Wednesday, November 18, 2026
  • Login
Pune Prime News
Download Android App
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
Pune Prime News
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
  • English

फडणवीस सरकारमधील मंत्र्यांवर १० हजार कोटींच्या भ्रष्टाचाराचा आरोप? राजकारणात खळबळ; नेमकं प्रकरण काय?

ASHLESHA MASKEby ASHLESHA MASKE
Wednesday, 18 November 2026, 16:28

मुंबई : राज्यातील कंत्राटदारांना कामांचे पैसे मिळण्यासाठी प्रतीक्षा करावी लागत असतानाच आता आदिवासी विकास विभागातील निधी वितरणावरून नवा वाद निर्माण झाला आहे. भाजपचे माजी मंत्री डॉ. विजयकुमार गावित आणि विद्यमान मंत्री डॉ. अशोक उईके यांच्यातील कथित राजकीय संघर्षामुळे विभागातील विकासकामे आणि कंत्राटदारांची देयके रखडल्याचा गंभीर आरोप महाराष्ट्र स्टेट गव्हर्नमेंट कॉन्ट्रॅक्टर फेडरेशनने केला आहे. विभागातील सुमारे सात हजार कोटी रुपयांची बिले अडकल्याचा दावा कंत्राटदारांनी केला असून, या प्रकरणामुळे राजकीय वर्तुळात खळबळ उडाली आहे.

महाराष्ट्र स्टेट गव्हर्नमेंट कॉन्ट्रॅक्टर फेडरेशनचे अध्यक्ष किसनराव पानसरे यांनी या प्रकरणाला वाचा फोडली आहे. आदिवासी विकास विभागातील निधी रोखण्यामागे भाजपच्या आजी-माजी मंत्र्यांमधील राजकीय मतभेद कारणीभूत असल्याचा आरोप कंत्राटदारांनी केला आहे. विद्यमान मंत्री डॉ. अशोक उईके यांनी या प्रक्रियेत भूमिका बजावल्याचा दावाही करण्यात आला आहे. मात्र, या आरोपांची स्वतंत्र पुष्टी झालेली नाही.

कंत्राटदारांच्या म्हणण्यानुसार, एकट्या नाशिक विभागातील सुमारे तीन हजार कोटी रुपयांची कामे रखडली आहेत. या संपूर्ण प्रकरणाबाबत आपल्याकडे पुरावे असल्याचा दावाही फेडरेशनकडून करण्यात आला आहे.

आदिवासी विकास विभागाला राज्याच्या अर्थसंकल्पातील सुमारे नऊ टक्के निधी लोकसंख्येच्या प्रमाणात दिला जातो. मात्र, विभागाच्या अंदाजपत्रकातील ८०० कोटी रुपयांची तरतूद ४०० कोटी रुपयांवर आणण्यात आल्याचा आरोप करण्यात आला आहे. त्यातही मंजूर निधी वितरित करताना जाणीवपूर्वक विलंब केला जात असल्याचे कंत्राटदारांचे म्हणणे आहे. विविध कारणे देत विभागाच्या वेगवेगळ्या लेखाशीर्षांवरील निधी रोखला जात असल्याचा दावाही त्यांनी केला आहे.

भाजपमधील अंतर्गत राजकारणाचा परिणाम केवळ कंत्राटदारांवरच नव्हे, तर आदिवासी भागातील विकासकामांवर आणि नागरिकांवरही होत असल्याची चिंता फेडरेशनने व्यक्त केली आहे. त्यामुळे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी या प्रकरणात हस्तक्षेप करावा, अशी मागणी करण्यात आली आहे.

नागपूर येथे होणाऱ्या हिवाळी अधिवेशनापूर्वी किमान ८०० कोटी रुपयांचा निधी उपलब्ध करून द्यावा, अशी मागणी फेडरेशनचे उपाध्यक्ष किसन पानसरे आणि अन्य पदाधिकाऱ्यांनी केली आहे. आता या आरोपांवर राज्य सरकार आणि आदिवासी विकास विभाग काय भूमिका घेतात, याकडे कंत्राटदारांसह राजकीय वर्तुळाचे लक्ष लागले आहे.

 

ASHLESHA MASKE

ASHLESHA MASKE

ताज्या बातम्या

पुण्यात ऑनलाईन पिस्टल विक्रीचा प्रकार! सुनसान टेकडीवर भेटण्याचा प्लॅन; पोलिसांनी टीप मिळताच सापळा रचला अन्…

Wednesday, 18 November 2026, 19:56

फर्ग्युसन रस्त्यावरील अतिक्रमणांवर अखेर महापालिकेचा हातोडा; आयुक्त स्वतः उतरले रस्त्यावर, २४,५०० चौरस फुटांवरील बांधकामे हटवली!

Wednesday, 18 November 2026, 19:32

दादर स्थानक आता ‘चैत्यभूमी’ नावाने ओळखले जाणार! मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची सर्वात मोठी घोषणा; कोट्यवधी अनुयायांची मागणी होणार पूर्ण

Wednesday, 18 November 2026, 19:30

पुण्यात भरवस्तीत संशियितरित्या फिरत होते दोघे; पोलिसांनी विचारपूस करत झडती घेताच असं काही सापडलं की…

Wednesday, 18 November 2026, 19:16

नागरिकांच्या मागणीनंतर आमदार माऊली आबा कटके यांच्या सूचनेनुसार घोड उजव्या कालव्याचे आवर्तन सुरू; १५० क्युसेक वेगाने पाणी सोडण्यास सुरुवात!

Wednesday, 18 November 2026, 19:03

शायना एनसींच्या कृतीने वाद पेटला! बाळासाहेबांच्या मुद्द्यावर उपमुख्यमंत्री शिंदें मैदानात, शिवसैनिकांना स्पष्ट सांगितले…

Wednesday, 18 November 2026, 18:27
Next Post

शेटफळगडे प्राथमिक आरोग्य केंद्रातील औषधसाठ्यावर डल्ला; वैद्यकीय अधिकाऱ्याविरोधात चोरीचा गुन्हा

  • About us
  • Privacy Policy
  • Grievance Redressal
  • Fact-Checking Policy
  • Ownership & Funding Info

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
Don`t copy text!
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.

news-on-whatsapp